डेंग्यूसदृश्य आजाराने महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: November 5, 2016 01:23 IST2016-11-05T01:15:54+5:302016-11-05T01:23:05+5:30
उस्मानाबाद : डेंग्यू सदृश्य आजारामुळे शहरातील पोलीस लाईन भागातील एका २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला़

डेंग्यूसदृश्य आजाराने महिलेचा मृत्यू
उस्मानाबाद : डेंग्यू सदृश्य आजारामुळे शहरातील पोलीस लाईन भागातील एका २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सकाळी शहरातील खासगी रूग्णालयात घडली असून, याबाबत आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील पोलीस लाईन भागातील प्रज्ञा जयंत मोहिते (वय-२३) या महिलेला गुरूवारी रात्री शहरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र, डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या प्रज्ञा मोहिते यांचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती डॉ़ एस़ आऱ डंबळ यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली़ डॉ़ डंबळ यांच्या माहितीवरून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ अधिक तपास हेकॉ खानापुरे हे करीत आहेत़