आंबेडकरी कार्यकर्त्यांसोबत पोलीस आयुक्तांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:05 IST2021-04-07T04:05:42+5:302021-04-07T04:05:42+5:30
आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी शहरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी ...

आंबेडकरी कार्यकर्त्यांसोबत पोलीस आयुक्तांची चर्चा
आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी शहरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी नियम व अटींच्या अधीन राहून भडकलगेट येथे होणाऱ्या अभिवादनासाठी परवानगी द्यावी, शहरातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करावी, सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करावी, जयंतीनिमित्त सजावटीला परवानगी द्यावी, आंबेडकरी कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे, सर्व जयंती मंडळांची बैठक घेऊन सहकार्याचे आवाहन करावे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदी आदेशाचे पालन करण्यात येईल, असा विश्वास दिला व काही मागण्या पुढे रेटल्या. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी भीम जयंतीनिमित्त आंबेडकरी अनुयायांची बैठक घेण्यावर सकारात्मकता दर्शविली.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, मीना मकवाना, सहायक पोलीस आयुक्त भापकर, ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते श्रावण गायकवाड, निवृत्त पोलीस उपाधीक्षक दौलतराव मोरे, विजयराव साळवे, विद्यार्थी प्रतिनिधी सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, राहुल खंडागळे, मुकुल निकाळजे आदींची उपस्थिती होती.