चर्चा करा, दुष्परिणामांची जाणीव करून द्या..
By Admin | Updated: May 31, 2014 00:27 IST2014-05-30T23:53:29+5:302014-05-31T00:27:07+5:30
प्रसाद आर्वीकर, परभणी कधी शौकाने तर कधी मोठेपणाचा आव आणत तंबाखू, सिगारेटसारख्या व्यसनांची साथ करणार्या युवकांची संख्या वाढत आहे.
चर्चा करा, दुष्परिणामांची जाणीव करून द्या..
प्रसाद आर्वीकर, परभणी कधी शौकाने तर कधी मोठेपणाचा आव आणत तंबाखू, सिगारेटसारख्या व्यसनांची साथ करणार्या युवकांची संख्या वाढत आहे. सारेच युवक व्यसनाधिन आहेत अशातला भाग नाही, परंतु व्यसन करणार्या युवकांची संख्या कमी नाही. त्यामुळे अशा व्यसनांपासून आपली मुले दूर रहावीत, यासाठी पालकांनी मुलांसमवेत मोकळेपणाने चर्चा करावी, त्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती द्यावी. तरच ते या घातकी चक्रव्यूहात अडकणार नाहीत, असे जाणकारांना वाटते. चौका-चौकात असलेले पान स्टॉल्स, किराणा दुकान अशा ठिकाणी सहज तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होतात. या पानस्टॉलवरील गर्दीच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्यांची संख्या किती अधिक आहे, ते सांगते. तंबाखू, सिगारेटचे व्यसन जडण्यास अनेक कारणे आहेत. तंबाखू सेवन करणे शरीरासाठी घातक असल्याचे अनेकांनी घसा कोरडा करुन सांगितले तरी व्यसनाधिता कमी झालेली दिसत नाही. जे या व्यसनाच्या आहारी गेले त्यांना व्यसनातून मुक्त करण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहेच, परंतु त्याहीपेक्षा अधिक भावी पिढी, भावी मुले या व्यसनाच्या आहारी जावू नयेत, यासाठी खर्या अर्थाने प्रयत्नांची गरज आहे आणि ही जबाबदारी पालक या नात्याने प्रत्येक नागरिकांवरच येऊन ठेपते.मग यासाठी नागरिकांनी काय करावे, मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी काही सोप्या गोष्टी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितल्या. आपापल्या मुलांच्या बाबतीत जरी प्रत्येकाने काळजी घेतली तरी मोठा परिणाम दिसून येऊ शकतो.आपल्या मुलांसमवेत सकारात्मक संवाद साधावा. व्यसनाचे दुष्परिणाम सांगावेत, दुष्परिणाम झालेल्या व्यक्तींची उदाहरणे मुलांना द्यावीत, मुले दिवसभर काय करतात, त्यांना काय आवडते, याचा बारकाईने अभ्यास करावा, मुलांचे मित्र कसे आहेत, त्यांच्या आई-निवडी कशा आहेत, हे जाणून घ्यावे. त्यांना चांगल्या मित्रांची संगत ठेवण्यास परावृत्त करावे, व्यसनाधिनतेविषयी अधिकाधिक चर्चा करावी. व्यसनांमुळे होणार्या आजारांची माहिती मुलांना द्यावी.शाळांमधूनही सकारात्मक प्रयत्न केल्यास भावी पिढीच्या व्यसनमुक्तीसाठी सकारात्मक पावले उचलली जाऊ शकतात. व्यसनमुक्तीची जनजागृती, व्यसनांचे वाढलेले प्रमाण यासारखे सर्वेक्षणाचे काम विद्यार्थ्यांकडून करुन घेतल्यास आपोआपच विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांपासून दूर राहण्याची प्रवृत्ती बळावू शकते.तरुण पिढीत तंबाखू सेवन हे व्यसन नव्हे,तर फॅशन बनले आहे. हीच फॅशन जिवघेणी ठरणारी आहे. त्यामुळे आज पालकांवर फार मोठी जबाबदारी आहे. कुटुंबप्रमुख व्यसनमुक्त असेल तर त्यांच्या कुटुंबातील मुलांवर ते संस्कार आपोआपच होतात. व्यसन म्हणजे मृत्यूला निमंत्रण हे मुलांच्या मनावर बिंबवायला हवं. आत्माराम वाळके, पोखर्णी नृ. आपण सकाळी ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ श्लोक म्हणतो. हातात लक्ष्मी, सरस्वतीचा वास असतो. त्याच हातावर तंबाखू आणि चुना लावत असू तर ते अहितच आहे. व्यसनांवर आळा घालण्यासाठी मनावर चांगल्या विचारांचा प्रभाव व चंगल्याची संगत असायला हवी, व्यसनाधिनतेमुळे जीवनाचा आकार बिघडतो. व्यसनमुक्त जीवनच खर्या जीवनाला आकार देऊ शकते. डॉ.दत्तात्रय मगर