‘डिस्को सन्या’ टीमची कॅम्पस क्लबसोबत धमाल

By Admin | Updated: July 16, 2016 01:19 IST2016-07-16T01:06:29+5:302016-07-16T01:19:45+5:30

औरंगाबाद : प्रसिद्ध मराठी कलावंत संजय खापरे व बालकलाकार पार्थ भालेराव यांची जुगलबंदी दाखविणारा नवीन मराठी चित्रपट ‘डिस्क ो सन्या’ लवकरच म्हणजे ५ आॅगस्ट रोेजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

DISCO SANYA team team with campus club | ‘डिस्को सन्या’ टीमची कॅम्पस क्लबसोबत धमाल

‘डिस्को सन्या’ टीमची कॅम्पस क्लबसोबत धमाल

औरंगाबाद : प्रसिद्ध मराठी कलावंत संजय खापरे व बालकलाकार पार्थ भालेराव यांची जुगलबंदी दाखविणारा नवीन मराठी चित्रपट ‘डिस्क ो सन्या’ लवकरच म्हणजे ५ आॅगस्ट रोेजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. शहरातील राधाकृष्ण प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, स्वामी विवेकानंद अकॅडमी या शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी धमाल गप्पा, गोष्टी करण्यासाठी या चित्रपटाची संपूर्ण टीम शहरात आली होती. कॅम्पस क्लबच्या सदस्यांसाठी ही एक पर्वणीच ठरली. बालकलाकार पार्थ भालेराव व प्रसिद्ध मराठी कलावंत संजय खापरे यांनी विद्यार्थ्यांसोबत मनमोक ळ्या गप्पा मारून धमाल केली. या चित्रपटातील एका गाण्यावर कलावंतांनी केलेल्या बहारदार नृत्यामुळे विद्यार्थी आनंदून गेले. बालकलाकार पार्थ भालेराव याने कॅम्पस क्लबची सदस्यता नोंदणी करण्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी मुख्य कलाकारांसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक नियाज मुजावर, निर्माते व संगीतकार सचिन पुरोहित, अभिजित कवठाळकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: DISCO SANYA team team with campus club