औरंगाबाद : सीईटी स्कोर बुस्टर (उएळ रूङ्म१ी इङ्मङ्म२३ी१) आणि विद्यालंकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’ प्रस्तुत ‘एचएससी+सीईटी यशाचा फॉर्म्युला’ या विषयावर दि.२५ रोजी तापडिया नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.प्रा. संदीप पाटील हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण प्रवेशाकरिता एचएससी+सीईटीचा अभ्यास कसा करावा, यासंदर्भात अनेक ‘टिप्स आणि ट्रिक्स’ त्यांनी अगदी सहजतेने समजावून सांगितल्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन तसेच विद्यालंकार औरंगाबादचे डॉ. यशपाल कदम आणि गौरी कदम, सीईटी स्कोर बुस्टरचे सुयोग पेणकर यांची उपस्थिती होती. प्रा. संदीप पाटील यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे विषय झटपट कसे सोडवावेत आणि सीईटीचा अभ्यास कसा करावा यासंबंधी मार्गदर्शन केले. डॉ. यशपाल कदम म्हणाले की, सीईटी स्कोअर बुस्टरच्या मदतीने विद्यार्थ्यांना कमी दिवसांमध्ये सीईटीचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. आजचा विद्यार्थी टेक्नॉलॉजीचा जाणता आहे. याच अनुषंगाने आम्ही बारावी सायन्स व एमएचटी-सीईटीचा संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना व्हिडिओ, अॅनिमेशनच्या स्वरूपात पेन ड्राईव्हमध्ये उपलब्ध करून दिला. यावेळी काही गुणवंतांना पाहुण्यांच्या हस्ते सीईटी स्कोर बुस्टरचे पेन ड्राईव्ह देऊन गौरविण्यात आले. पालक व विद्यार्थ्यांनी या स्तुत्य उपक्रमाबाबत आयोजकांचे आभार मानले. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले.
‘टिप्स आणि ट्रिक्स’चा उलगडा
By admin | Updated: December 27, 2015 00:16 IST