शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

जायकवाडी धरणातून ३७,७२८ क्युसेक विसर्ग; आवक वाढल्याने १८ दरवाजे दोन फुटांनी उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 3:31 PM

गोदाकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

ठळक मुद्देविसर्ग वाढल्याने जायकवाडी धरणाखालील पूल पाण्याखाली गेलाधरणाकडे जाणारे रस्ते पोलिसांकडून बंद 

पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणातून रात्री ३७,७२८ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. रात्री ८ ते ८.३० वाजेदरम्यान धरणाचे १८ दरवाजे दोन फुटांनी वर उचलण्यात आले. यात धरणाखालील पूल पाण्याखाली गेला असून, दक्षिण जायकवाडीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान, गोदाकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

रविवारी दुपारपर्यंत धरणातून २५,१५२ क्युसेक विसर्ग जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजांतून सुरू होता, तर धरणामध्ये २१,४४२ क्युसेक आवक होत होती. आवक व विसर्ग, असा असताना धरणाचा जलसाठा ९९.४४ टक्के कायम होता. मात्र, दुपारनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रात्री धरणाचे १८ दरवाजे दोन फुटांनी वर उचलून धरणातून १२,५७६ क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे धरणातून ३७,७२८ क्युसेक विसर्ग सुरू होता. गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू झाल्याने धरणाखालील पूल पाण्याखाली गेला होता.  धरण काठोकाठ भरत आले असताना येणारे पाणी सामावून घेण्यासाठी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून, धरणाचा जलसाठा ९८.४० टक्के इतका कमी करण्यात येईल, असे जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. 

रविवारी सायंकाळी नाथसागराची  पाणीपातळी १,५२१.९० फुटांपर्यंत, तर ४६३.८७५ मीटरमध्ये झाली होती. धरणात आवक  २१,४४२ क्युसेक होत होती. धरणाचा एकूण जलसाठा २,८९७.१०० दलघमी, तर जिवंत पाणीसाठा २,१५८.९९४ दलघमी झालेला आहे. धरणाची टक्केवारी ९९.४४ टक्के झाली असून, उजव्या कालव्यातून   ६०० क्युसेक व डाव्या कालव्यातून १,५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे, असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले. आवक लक्षात घेता धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ किंवा घट होऊ शकते, असे राजेंद्र काळे म्हणाले.

धरणाकडे जाणारे रस्ते पोलिसांकडून बंद जायकवाडी धरणाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून, तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धरण परिसरात पायी जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्यानंतर पर्यटकांची गर्दी होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी