शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

कें द्रीय पुरातत्व विभागाचा अडेलतट्टूपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:55 IST

पर्यटन स्थळ म्हणून विकसित असलेल्या राज्यातील अनेक वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करून पर्यटनाला चालना देण्याच्या मोठ्या संधी आहेत. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे विकास रखडलेला असल्याचा आरोप राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केला.

ठळक मुद्देजयकुमार रावल : राज्यातील पर्यटन केंद्रांना पायाभूत सेवा-सुविधा देणार

औरंगाबाद : पर्यटन स्थळ म्हणून विकसित असलेल्या राज्यातील अनेक वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करून पर्यटनाला चालना देण्याच्या मोठ्या संधी आहेत. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे विकास रखडलेला असल्याचा आरोप राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केला.पर्यटन विभागाच्या नेतृत्वात औरंगाबादेत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजन केले आहे. यासाठी २९ बुद्धिस्ट देशांतील २०० प्रतिनिधी आले आहेत. या प्रतिनिधींमुळे राज्याचे पर्यटन जागतिक स्तरावर पोहोचले आहे. या परिषदेचे भारतात पहिल्यांदाच आयोजन केले जात असून, त्याचा मान महाराष्ट्राला मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील पर्यटनातील अडचणी आणि उपाययोजना विषयी प्रसारमाध्यमांशी जयकुमार रावल बोलत होते. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी पायाभूत सुविधा, पर्यटकांना आकर्षित केले जाईल, असे उपक्रम राबवता येऊ शकातात. त्या ठिकाणी हा विभाग सोयी-सुविधा पुरवत नाही. त्या पुरविण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. मात्र, त्यासाठी परवानगीही देण्यात येत नाही. अनेक योजना अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पडून आहेत. त्याची अंमलबजावणी होत नसल्याचेही रावल यांनी स्पष्ट केले. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. यात पर्यटकांसाठी लागणाºया अत्यावश्यक सेवा-सुविधापासून प्रत्येक गोष्टीचा साकल्याने विचार करीत आहे. त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही. याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक लक्ष देत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे, औरंगाबाद ते जळगाव, चंद्रपूर, लोणार, सिंधुदुर्ग या ठिकाणांना कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकाच ठिकाणाहून राज्यातील प्रत्येक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जाण्यासाठी पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, तिकीट, निवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.एकाच ठिकाणाहून सर्व काहीपर्यटन विभाग पर्यटकांना एकाच ठिकाणाहून राज्यातील कोणत्याही पर्यटनस्थळाच्या ठिकाणची निवास व्यवस्था, वाहतूक, तिकीट आणि दिवसभर वास्तू पाहिल्यानंतर सायंकाळी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देईल. यामुळे येणारा प्रत्येक पर्यटक आपल्या भागातील नागरिकांना महाराष्ट्रातील पर्यटनासाठी पाठवून देईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही रावल यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBuddha Cavesबौद्ध लेणीJaykumar Rawalजयकुमार रावल