शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद

By विकास राऊत | Updated: August 8, 2024 14:40 IST

कुलगुरू म्हणतात सरळसेवा भरतीतून मेरीटचे उमेदवार मिळतील

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता आणि विभागप्रमुखांची पदे पदोन्नतीने भरण्याऐवजी सरळ सेवा भरतीने भरण्यावरून चार कुलगुरू आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात मतभेद असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत सूचना करूनही कुलगुरूंनी मंत्र्यांना दाद न दिल्याने कृषिमंत्री मुंडे यांनी पदोन्नतीच्या मुद्यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आबीटकर यांना बुधवारी पत्र दिले.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि सहयोगी अधिष्ठातांच्या पदोन्नतीबाबत निवड समितीच्या दोन बैठका कृषिमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली २९ व ३० जुलै दरम्यान झाल्या. त्यात केवळ प्राध्यापक पदांचा विचार झाला. परंतु विभागप्रमुख आणि सहयोगी अधिष्ठातांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव कृषी परिषदेने मान्यतेसाठी ठेवूनही त्यावर कार्यवाही झाली नाही. तो विषय स्थगित ठेवण्यात आला.

सोशल मीडियातून टीकाकृषी विद्यापीठामध्ये सहयोगी अधिष्ठाता व विभागप्रमुख ही पदे ५० टक्के पदोन्नती व ५० टक्के सरळसेवा भरतीने भरावीत, असा शासनाचा नियम आहे. आता जी पदे भरायची आहेत, ते मागासवर्गीय आहेत. त्यामुळे ही पदे पदोन्नतीने भरण्याऐवजी पदे सरळ सेवा भरतीने भरण्यासाठी कुलगुरू एकवटल्याची टीका सोशल मीडियातून होत आहे.

चार विद्यापीठांत सुमारे १०० प्रकरणेडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या विद्यापीठांत सुमारे १०० पदोन्नतीचे प्रस्ताव आहेत. ही सगळी पदे मागासवर्गीय असल्याची चर्चा आहे. सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात असल्याचे मीम्स सोशल मीडियातून येत असल्यामुळे कृषिमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत, सेवा प्रवेश मंडळाच्या अध्यक्षांना पत्र देऊन लवकर निर्णय घेण्याची सूचना केली आहे.

तातडीने निर्णय घेण्यासाठी मुंडे यांचे पत्रपदोन्नती रखडल्यामुळे विद्यापीठातील वरिष्ठांवर अन्याय होत असल्याचा संदेश जातो आहे. अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सोशल मीडियात कृषी विद्यापीठांबाबत नकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे पदोन्नतीबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा.-धनंजय मुंडे, कृषी मंत्री( ७ ऑगस्ट २०२४ रोजी अध्यक्षांना दिलेले पत्र )

सरळसेवा भरतीतून मेरिटचे शास्त्रज्ञ मिळतीलपदोन्नती ऐवजी सरळसेवा भरती केली तर मेरिटचे शास्त्रज्ञ मिळतील. पूर्ण देशात ही पदे सरळसेवा भरतीने भरली जातात. इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरमध्ये हाच नियम आहे. मेरिट हवे असेल तर काही निर्णय घ्यावे लागतील. मंत्र्यांची जी भावना आहे, त्याबाबत सेवा प्रवेश मंडळ बैठक घेऊन चर्चा करेल. महाराष्ट्राचे शास्त्रज्ञ राष्ट्रीय पातळीवर जावेत, त्यासाठी मेरिटवर चांगले उमेदवार येतील, अशी माझी भावना आहे. देशात या पदांवर पदोन्नती होत नाही. स्पर्धात्मक निवड राज्यात व्हावी ही अपेक्षा आहे. सेवा मंडळाचे अध्यक्ष आबीटकर यांची समिती यावर निर्णय घेईल.-डॉ. इंद्रमणी, कुलगुरू, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेAurangabadऔरंगाबादVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठState Governmentराज्य सरकार