शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय

By admin | Updated: August 31, 2014 01:09 IST

रोकडा सावरगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदपूर आगारातील बहुतांशी बसेस ह्या नादुरस्त, गळक्या असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़

रोकडा सावरगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदपूर आगारातील बहुतांशी बसेस ह्या नादुरस्त, गळक्या असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ त्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत असून अवैध वाहतुकीकडे प्रवाशांचा ओढा वाढलेला पहावयास मिळत आहे़अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील नागरिक एसटी महामंडळाने बसनेच प्रवास करतात़ विशेष म्हणजे, सन २००० मध्ये येथील ग्रामपंचायतने ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन खाजगी अवैध प्रवाशी वाहतूक बंद करुन महामंडळाची बस चालू करावी़ जर गावातील कोणी अवैध वाहनाने प्रवास केल्यास त्याला दंड लावण्यात येईल असे बजावले होते़ तत्कालिन आगारप्रमुख गोले यांना बस सुरु करण्याची मागणी केली होती़ तेव्हा आगारप्रमुखानी जनता सेवा गाडी सुरु केली़ त्यामुळे ग्रामस्थांना बसशिवाय पर्याय नव्हता़ त्यामुळे सन २००० पासून ते आजतागायत गावातील नागरिक केवळ बसनेच प्रवास करत असतात़बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ध्येय ठेऊन एसटी महामंडळाने प्रवाशांना सेवा देण्यास सुरु केली आहे़ परंतु, आलिकडच्या काळात अनेक बसेस मोडकळीस आल्या आहेत़ यातील काही बसेसच्या काचा फुटलेल्या आहेत तर काही बसेसमध्ये बसण्यासाठी व्यवस्थित सीट नाहीत़ पावसाळ्याच्या दिवसात बसेसला गळती लागलेली असते़ या मोडकळीस आलेल्या बसेस ग्रामीण भागासाठी सोडण्यात येत आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ एखाद्यावेळेस बस पंक्चर झाली तर अहमदपूर डेपोतून टायर आणावे लागते़ टायर आणण्यासाठी ३ ते ४ तास लागतात़ त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे़ मोडकळीस आलेल्या बसेसमुळे प्रवाशी वैतागले आहेत़ मुक्कामी जाणाऱ्या वाहक व चालकांची या गाड्यांमुळे अडचण होत आहे़ (वार्ताहर)अहमदपूर आगारामध्ये एकूण ८२ बसेस असून त्यातील काही गाड्या मोडकळीस आल्या आहेत़ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बसेसचे नुकसान होत आहे़ त्यामुळे पावसाळ्यात गाड्या गळत आहेत़ प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य ती दक्षता घेतली जाईल, असे अहमदपूरचे आगार प्रमुख एऩपी़जाधव यांनी सांगितले़