शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जमीनमोजणीसाठी थेट सॅटेलाइटची मदत; ‘रोव्हर’द्वारे होतेय अचूक अन् झटपट मोजणी!

By विजय सरवदे | Updated: July 31, 2023 12:53 IST

रोव्हरचे कनेक्शन सॅटेलाइटशी आहे. त्यामुळे कुठूनही रोव्हर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूकता दर्शविते.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात भूमी अभिलेख कार्यालयाकडे जमीनमोजणीसाठी आलेल्या शेकडो अर्जांचा ढीग लागायचा. कमी मनुष्यबळामुळे प्रलंबित अर्जांची संख्या वाढतच होती. आता ‘रोव्हर’ या उपकरणामुळे कमी वेळेत आणि अचूक जमीनमोजणी होत असल्यामुळे शेतकरी, नागरिकांचा वेळ वाचत आहे. मोजणीसाठी अतितातडीचे शुल्क भरले तरी दोन महिने लागायचे, साधे शुल्क भरले तर तीन महिने लागायचे. आता साधे शुल्क भरणाऱ्यास एक ते दीड तर अतितातडीच्या मोजणीसाठी एक महिना लागत आहे.

काय आहे रोव्हर?रोव्हरचा संपर्क थेट उपग्रहाशी आहे. रोव्हर हा एक मुव्हिंग ऑब्जेट आहे, जो मोजणीच्या ठिकाणी घेऊन जाणे शक्य आहे. याचे कनेक्शन सॅटेलाइटशी आहे. त्यामुळे कुठूनही रोव्हर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूकता दर्शविते. रोव्हर घेऊन शेतात मोजणीसाठी जाता येईल, असे ते साधन आहे.

अचूक आणि झटपट मोजणीरोव्हरद्वारे १ हेक्टर क्षेत्राची मोजणी केवळ ३० मिनिटांत होते, असा भूमी अभिलेख विभागाचा दावा आहे. अचूक आणि झटपट मोजणी या यंत्राद्वारे होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

तीन महिन्यांत दोन हजार प्रकरणे निकालीजिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी रोव्हरच्या साहाय्याने जमीनमोजणीचे काम सुरू झाले आहे. तीन महिन्यांत सुमारे दोन हजार प्रकरणे निकाली काढली आहेत. शहरात आठ रोव्हर आहेत; तर तालुक्याच्या ठिकाणी दोन ते तीन रोव्हर देण्यात आले आहेत.

कोणत्या तालुक्यात किती प्रकरणे निकाली?तालुका................ निकाली प्रकरणेऔरंगाबाद... १३७७फुलंब्री...... ९०पैठण.... ७०सोयगाव... ८०सिल्लोड..... ६३कन्नड.... ८८गंगापूर.... ९५खुलताबाद.... ४८वैजापूर..... ८९

अर्ज केल्यावर तीन महिने लागायचेरोव्हरपूर्वी जमीन मोजणी करण्यासाठी तीन महिने लागायचे. आता महिन्याभरात मोजणी होऊन शेतकऱ्यांच्या हाती नकाशा पडणे शक्य झाले आहे. तातडीचे शुल्क भरून देखील शेतकऱ्यांची तारांबळ होत आहे.

जिल्ह्यात ४१ भूमापक....जिल्ह्यात नऊ भूमी अभिलेख कार्यालय आहेत. शहर कार्यालयात १७ भूमापक आहेत; तर जिल्ह्यातील आठ कार्यालयांत सुमारे २४ भूमापक आहेत. १३७३ गावांतून येणाऱ्या अर्जांसाठी ही यंत्रणा काम करते.

अचूक मोजणी होत आहेअक्षांश, रेखांशांसह सॅटेलाइटशी कनेक्ट आहे. जिल्ह्यात दोन स्टेशन आहेत. जर नैसर्गिक आपत्तीने जमिनीच्या मार्किंग गेल्या तरी रोव्हरच्या आधारे पुन्हा सर्व मार्किंग जुळविणे शक्य होणार आहे. जमिनी कॉर्डिनेशनचा डाटा रोव्हरमुळे संकलित होणार आहे. कमी वेळेत अचूक मोजणी होते.-नीलेश उंडे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी