शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हमाली केली पण कब्बडी नाही सोडली; मजुराचा मुलगा अक्षय सूर्यवंशी खेळणार प्रो-कब्बडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 16:00 IST

यूपी योद्धा संघात समावेश; भारतीय संघाकडून कब्बडी खेळण्यासाठी प्रयत्न करणार

- समीर पठाण जायकवाडी ( छत्रपती संभाजीनगर) : जीवनात काहीतरी करायचे असेल तर जिद्द, चिकटी आणि मेहनत हवी असते. या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश नक्कीच मिळते, हे अक्षय रमेश सूर्यवंशी याने दाखवून दिले आहे. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवत अक्षयने देशभरात नाव कमावले आहे. नामवंत प्रो कब्बडी स्पर्धेत अक्षयने स्थान मिळविले आहे. यूपी योद्धा संघात त्याचा समावेश झाला असून तब्बल बारा लाख ९० हजार रुपयांची बोली लागली होती. 

पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना येथे गीतांजली नगर आहे. येथेच अक्षय रमेश सूर्यवंशी (वय २३) हा आई-वाडीलांसोबत राहतो. आई-वडील दोघेही मोलमजुरी करतात. लहानपणापासून कब्बडीची आवड असलेल्या अक्षयने भीमाशंकर विद्यालय येथून तयारी सुरू केली. हलाखीची परिस्थिती असल्याने छत्रपती संभाजीनगर येथे हमाली, केटरर्सचे काम केले. सोबतच कब्बडीचा सराव सुरूच ठेवला.

यातूनच दि.१६ शुक्रवारी रोजी मुंबई येथे प्रो-कब्बडी लिग सीजन-११ ऑक्शन सोहळा पार पडला. यामध्ये लेफ्ट रायडर म्हणून प्रचलित असलेल्या अक्षय यास युपी योद्धा या संघाने १२ लाख ९० हजार रूपयांची बोली लावत खरेदी केले. या यशामागे आई वडील, प्रशिक्षक स्वप्नील गव्हाणे, बाबुराव तांदरे, निलेश गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे अक्षयने सांगितले.

अक्षयची राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल...अक्षय ने आतापर्यंत महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच  तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय मध्ये सुद्धा खेळाला आहे.

भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न...अक्षय याच्या कुटुंबांमध्ये आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. प्रो कब्बडीमध्ये चांगला खेळ खेळून भारतीय संघाकडून कब्बडी खेळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अक्षयने लोकमत ला बोलताना सांगितले.

पोराने कष्टाचे चीज केले...मी कंपनीमध्ये काम करत असताना सायंकाळी ५ वाजता मुलाला युपी योद्धा या संघाने खेळविण्यासाठी समाविष्ट केल्याचे समजले. हलाखीची परिस्थिती असताना मुलगा इथपर्यंत जाऊ शकला याचा आनंद असून, पोराने कष्टाचे चीज केले असे वडील रमेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीग