धर्मापुरी... एक गाव फक्त कागदावरचं !

By Admin | Updated: March 28, 2015 00:45 IST2015-03-28T00:25:27+5:302015-03-28T00:45:27+5:30

रमेश कोतवाल , देवणी देवणी व उदगीर तालुक्यांच्या सीमेवर अन् निसर्गरम्य हत्तीबेटाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव़़़

Dharmapuri ... a village is just on paper! | धर्मापुरी... एक गाव फक्त कागदावरचं !

धर्मापुरी... एक गाव फक्त कागदावरचं !



रमेश कोतवाल , देवणी
देवणी व उदगीर तालुक्यांच्या सीमेवर अन् निसर्गरम्य हत्तीबेटाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव़़़ धर्मापुरी़ महसूल दफ्तरी या गावाची नोंद देवणी तालुक्यात़ या नोंदीनुसार आजही या ठिकाणी गाव नांदतेय़् परंतु, प्रत्यक्षात मात्र याठिकाणी उभे आहेत, भग्नावशेष़ येथे रहायला कोणीच नाहीत़ परंतु, सरकारी नोंदीमुळे प्रत्येक उपक्रमाच्या वेळी यंत्रणेची हकनाक धावपळ होते़
धर्मापुरी या अजब गावाची गजब कहाणी अशी की, हे गाव महसुली दर्जा प्राप्त आहे़ गुरधाळ-पेठेवाडीजवळ हत्तीबेटाच्या पायथ्याशी या गावाचे अस्तित्व़ या गावाचे भौगोलिक क्षेत्र १२६ हेक्टर्स इतके सर्व्हे क्रमांक १९ मध्ये विभागून होते़ या नोंदी आजही तशाच शाबित आहेत़ येथील जमिनी १९५३-५४ च्या खासरा पाणी नोंदीनुसार महादा फावडे, धोंडिबा पाटील, पांडुरंग गुरव, महंमद कासार, रामबुवा काशीनाथ बुवा, तुकाराम बंडगर, केशवराव कुलकर्णी, गंडा बंडगर, गोपाळ पेठे, संभाजी पेठे, नामदेव पेठे, नरसिंग बंडगरे, पांडुरंग बिरादार, गोविंद कुलकर्णी यांच्या नावे आहेत़ दरम्यानच्या काळात हळुहळु हे गाव शेजारच्या गावांमध्ये मिसळून गेले़ येथील नागरिक टप्प्या-टप्प्याने गावाजवळील सय्यदपूर, महमदापूर, चवणहिप्परगा व पेठेवाडी या गावांमध्ये स्थायिक झाले़ येथील जमिनीही कालांतराने शेजारच्या गावांतील नागरिकांच्या नावे हस्तांतरित झाल्याचे महसूल विभाग सांगतो़ त्यामुळे हे गाव गेल्या कित्येक वर्षांपासून ओस पडलेले आहे़ येथील जुने भग्नावशेष सध्या वस्तीची साक्ष देत उभे आहेत़
धर्मापुरीच्या नोंदी प्रशासनासाठी मात्र दमछाक करणाऱ्या ठरत आहेत़ कोणत्याही शासकीय उपक्रमानिमित्त बऱ्याचदा यंत्रणा या गावाकडे चक्कर टाकतात़ परंतु, येथे कोणीच वास्तव्यास नसल्याने त्यांचा फुकटचा हेलपाटा पडत आहेत़ मागच्याच जनगणनेच्या वेळीही प्रगणक या गावी पाठविण्यात आला होता़
अलिकडच्या कालावधीत आधार कार्डचा कॅम्प या गावात लावण्यात आला होता़ त्यानुसार सगळी यंत्रणा तिथे गेली़ मतदार नोंदणी किंवा अन्य सर्व्हेच्या वेळीही शासकीय यंत्रणांना असाच अनुभव येत असल्याने धर्मापुरी म्हणजे प्रशासनासाठी भुलभुलैय्याच ठरले आहे़
धर्मापुरी-सय्यदपूर ग्रुप ग्रामपंचायतीला जोडलेली आहे. तर गुरधाळ तलाठी सज्जाअंतर्गत अजूनही कागदोपत्री गाव जोडलेले आहे.
४विविध उपक्रमाची माहिती देण्यासाठी सरकारी नोंदीमुळे कर्मचाऱ्यांची नाहक धावपळ.
४कित्येक वर्षांपासून ओस पडलेले गाव महसूल दप्तराच्या नोंदीमुळे चर्चेत.

Web Title: Dharmapuri ... a village is just on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.