आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर
By Admin | Updated: August 1, 2014 00:28 IST2014-08-01T00:06:18+5:302014-08-01T00:28:08+5:30
उस्मानाबाद : घटनेनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणे गरजेचे असतानाही केवळ हिंदीतील धनगड या शब्दामुळे राज्यातील धनगर समाजबांधवांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही़
आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर
उस्मानाबाद : घटनेनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणे गरजेचे असतानाही केवळ हिंदीतील धनगड या शब्दामुळे राज्यातील धनगर समाजबांधवांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही़ त्यामुळे धनगर समाजाचा एस़टी़प्रवर्गात समावेश करून आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात गुरूवारी ठिकठिकाणी रास्तारोको, मोर्चा, धरणे आंदोलन करण्यात आले़ काक्रंबानजीक बसवर दगडफेक करण्यात आली़ धनगर समाजाच्या आंदोलनाने जिल्हा दणाणला होता़
लोहारा तालुक्यातील आष्टामोड येथे शेळ्या, मेंढरे घेऊन रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील बसथांब्यानजीक रास्तारोको दरम्यान बसवर दगडफेक करण्यात आली़़ वर दगडफेक करण्यात आली़ या आंदोलनात भाजपा महिला आघाडीच्या महानंदा पैलवान, शाम ढेरे, राजाभाऊ शेंडगे, उमेश खांडेकर, शहाजी देवगुंडे, उपसरपंच उमेश पाटील, आनंद मदणे, अमृत झाडे, कल्पना शिरगिरे, विठ्ठल देवगुंडे, पुतळाबाई मदणे, विष्णू शिरगिरे, व्यंकट झाडे, नागनाथ कोरे, शिवाजी कोरेकर, सुनील पाटील, अॅड़नागनाथ कानडे, बाबूराव मदणे, अशोक देवगुंडे यांच्यासह काक्रंबा, काक्रंबावाडी, तडवळा, मोर्डा, तुळजापूर, कार्ला आदी परिसरातील समाजबांधव सहभागी झाले होते़
उस्मानाबादेत धरणे
येथे धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी गोविंद कोकाटे, अॅडख़ंडेराव चौरे, दत्ता बंडगर, राजाभाऊ वैद्य, आश्रूबा कोळेकर, सुनील काकडे, संदीप वाघमोडे, राजाराम तेरकर, इंद्रजित देवकते, कमलाकर दाणे, अनिल ठोंबरे, अमोल कसपटे, शिवाजी गावडे, पिंटू गायके, दत्ता गायके, केशव सलगर, अमोल पाडुळे आदी समाजबांधव सहभागी झाले होते़
ग्रामपंचायतीवर मोर्चा
उमरगा : तालुक्यातील गुंजोटी ग्रामपंचायतीवर धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सरपंच सहदेव गावयकवाड व ग्रामविकास अधिकारी बिराजदार यांना निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये दशरथ देवकते, खंडू दूधभाते, शिवकरण सूर्यवंशी, मनोज दुधभाते, दयानंद काटे, सरस्वती काळे, बंडाबाई बनसोडे, दीपक काळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.
तासभर रास्ता रोको
उस्मानाबाद : धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी दुपारी २ वाजता तालुक्यातील आष्टामोड येथे राष्ट्रीय महामार्गावर जवळपास तासभर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आर. डी. शेंडगे, उमाकांत लांडगे, अॅड. सत्यवान आडसुळे, धनंजय सातपुते, अशोक बनसोडे, प्रकाश घोडगे, हरिश डावरे, प्रदीप मदने, दिलीप भालेराव आदींची उपस्थिती होती.
आंदोलकांवर गुन्हा
तुळजापूर- लातूर मार्गावरील काक्रंबा बसस्थांब्याजवळील आंदोलनादरम्यान बसवर (क्ऱएम़एच़२०- बी़एल़२०९२) दगडफेक करण्यात आली़ यात बसचे ४० हजार रूपयांचे नुकसान झाले़ या याबाबत सपोनि शाम बुवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धोंडीराम झाडे, नागनाथ खताळ, शाम ठेरे, शहाजी देवगुंडे, सचिन ढेरे, व्यंकट झाडे, उमेश पाटील, विठ्ठल देवगुंडे, उमेश खांडेकर, अंगद मदने (सर्व रा़ काक्रंबा), राजेंद्र शेंडगे, अॅड़ कानडे, महानंदा पैलवान, शिवाजी कोळेकर (सर्व राक़ाक्रंबावाडी), अंगद सलगर (मंगरूळ), दत्ता बंडगर (उस्मानाबाद) आदी १६ जणांसह १००० ते १२०० जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बेंबळीत मेंढर मोर्चा
तालुक्यातील बेंबळी येथे धनगर विकास परिषदेच्या वतीने ग्रामपंचायतीवर मेंढरांचा मोर्चा काढण्यात आला़ यावेळी शिवाजी गावडे, डॉग़ोविंद कोकाटे, बिरू वाघुलकर, दत्ता सुडके, तानाजी फस्के, गोरोबा लोकरे, बालाजी गावडे, बालाजी दाणे, अमोल गाडे, मारूती कस्पटे, राजाभाऊ सोनटक्के, अर्जुन सोनटक्के आदी समाजबांधव सहभागी झाले होते़