धनगर समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: July 29, 2014 01:09 IST2014-07-29T00:04:03+5:302014-07-29T01:09:51+5:30
अंबड : अनुसूचित आरक्षण अंमलबजावणीसाठी अंबड तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती कृती समितीच्या वतीने सोमवार २८ जुलै रोजी शहरातील मत्स्योदरी देवी मंदिर परिसरातील
धनगर समाजाचा मोर्चा
अंबड : अनुसूचित आरक्षण अंमलबजावणीसाठी अंबड तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती कृती समितीच्या वतीने सोमवार २८ जुलै रोजी शहरातील मत्स्योदरी देवी मंदिर परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा ते तहसील कार्यालयापर्यंत सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शेळया-मेंढ्यांसह पारंपरिक वाद्य वाजवित घोंगडी खांद्यावर घेऊन मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, क्रीडामंत्री पद्माकर वाळवी व विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्या प्रतीकात्मक पुतळयाचे दहन केले. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणही केले.
आंदोलनाला आ.संतोष सांबरे, माजी आ.शिवाजीराव चोथे, भाजपाचे डॉ.राजेंद्र ठोसर, शहराध्यक्ष रमेश शहाणे, औदुंबर बागडे, एम.पी.जे.चे अजिम पाशा, समता परिषदेचे संदीप खरात, नगरसेवक शिवप्रसाद चांगले, दिलीप खरात, खुर्शिद जिलाणी आदींनी सहभागी होऊन पाठिंबा दिला.
आंदोलनाचे नेतृत्व भानुदास तात्या भोजने, अॅड.अशोक तार्डे, इंजि.बाबासाहेब भोजने, देविदास अण्णा खटके, बाळासाहेब पांढरे, अप्पासाहेब वैराळ, डॉ.नंदकिशोर पिंगळे, बाबासाहेब आटोळे, रामभाऊ लांडे, बाळासाहेब तार्डे, अशोक लांडे, विलास लांडे, बाबूराव खरात, डॉ.एल.डी.भोजने, अॅड.लक्ष्मण गायके, प्रमोद तार्डे, डॉ.गंगाधर पांढरे आदींनी केले. यावेळी धनगर समाजास अनुसूचित जातीचे आरक्षण तसेच विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. समाजाकडून मागण्या पूर्ण करण्यासाठी कासा पाठपुरावा होत आहे, याची माहिती प्रमुख नेत्यांनी यावेळी दिली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात अॅड.रामेश्वर गायके, अॅड.वैभव खटके, अॅड.रामेश्वर गावडे, अॅड.कैलास जारे, अॅड.विशाल पांढरे, अॅड.दिनेश लोणे, भगवानराव डोईफोडे, सोपानराव डोईफोडे, दीपक पांढरे, जय खरात, संजय बेवले, गजानन वायसे, पंकज पांढरे, संतोष खरात आदी होते. (वार्ताहर)