धामोरीच्या ग्रामसेवकास धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST2021-01-08T04:08:40+5:302021-01-08T04:08:40+5:30

वाळूज महानगर : धामोरी ग्रामपंचायत कार्यालायास मासिक बैठकीला आलेल्या ग्रामसेवकास मंगळवारी (दि. ५) दुपारी ग्रामपंचायत सदस्याने धक्काबुक्की करून जिवे ...

Dhamori villager threatened to kill by pushing and shoving | धामोरीच्या ग्रामसेवकास धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी

धामोरीच्या ग्रामसेवकास धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी

वाळूज महानगर : धामोरी ग्रामपंचायत कार्यालायास मासिक बैठकीला आलेल्या ग्रामसेवकास मंगळवारी (दि. ५) दुपारी ग्रामपंचायत सदस्याने धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य योगेश शेळके यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

वाळूजलगतच्या धामोरी ग्रामपंचायतीची मंगळवारी मासिक सभा होती. ग्रामसेवक ताराचंद उत्तमराव वाबळे (वय ४९, रा. सिडकोवाळूज महानगर) ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. ग्रामपंचायत सदस्य योगेश शेळके याने ग्रामसेवक ताराचंद उबाळे यांना सरपंच बैठकीस का आले नाही, त्यांना फोन करून बोलावा, असे म्हणून वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ग्रामसेवक वाबळे यांनी शिवीगाळ करू नका असे म्हणताच शेळके त्यांची शर्टाची कॉलर पकडून फाडली. या प्रकरणी ग्रामसेवक ताराचंद वाबळे यांच्या तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्य योगेश शेळके याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा शेळके यास अटक करण्याची कारवाई सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.

------------------------ ----

Web Title: Dhamori villager threatened to kill by pushing and shoving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.