धामोरी जि.प.शाळेतील शिक्षक ४ वर्षांपासून गायब
By Admin | Updated: June 28, 2016 00:53 IST2016-06-28T00:38:08+5:302016-06-28T00:53:49+5:30
वाळूज महानगर : शेंदूरवादा केंद्रांतर्गत येणाऱ्या धामोरी जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक चक्क चार वर्षांपासून गायब असून, याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पालकांत असंतोषाचे वातावरण आहे.

धामोरी जि.प.शाळेतील शिक्षक ४ वर्षांपासून गायब
वाळूज महानगर : शेंदूरवादा केंद्रांतर्गत येणाऱ्या धामोरी जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक चक्क चार वर्षांपासून गायब असून, याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पालकांत असंतोषाचे वातावरण आहे. शिक्षक नसल्यामुळे १५ विद्यार्थ्यांनी दाखले काढून आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला आहे. याबाबत उपसरपंच पतीने १ जुलै रोजी जि.प. कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
येथील जिल्हा परिषद शाळेत एका पदवीधर शिक्षकाची जागा रिक्त असल्यामुळे शाळेत गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी शिक्षकच नाही. रिक्त पदे भरण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनकर शेळके, हिरा शेळके, नंदू शेळके, श्रीमंत चव्हाण, राजेंद्र चव्हाण, लक्ष्मीबाई शेळके, संदिपान शेळके, भगवान शेळके, मधुकर शेळके, भाऊसाहेब कीर्तिशाही, भीमराज कीर्तिशाही, बाळू वाघ आदींनी केली आहे. या विषयी मुख्याध्यापक शिवाजी ढाकणे म्हणाले की, या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.