कर्मचारी निवासस्थाने पडली ओस
By Admin | Updated: August 23, 2014 00:45 IST2014-08-22T23:50:45+5:302014-08-23T00:45:47+5:30
विठ्ठल भिसे, गंगाखेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला चार वर्षापासून कायमस्वरुपी उपविभागीय अधिकारी नाही़ यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही़

कर्मचारी निवासस्थाने पडली ओस
विठ्ठल भिसे, गंगाखेड
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला चार वर्षापासून कायमस्वरुपी उपविभागीय अधिकारी नाही़ यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही़ तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात कोणीच राहत नसल्यामुळे ओस पडली आहेत़
पाथरी येथे पाथरी आणि मानवत या दोन तालुक्यासाठी सा़ बां़ विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे़ तसेच सा़ बां़ च्या विश्रामगृहाच्या आवारात कर्मचाऱ्यांसाठीची निवासस्थाने आहेत़ सतत इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना या उपविभागाचा पदभार सोपविण्यात येत आहे.
कधी जिंतूर, गंगाखेड तर कधी सोनपेठच्या अधिकाऱ्याकडे पदभार देण्यात आला आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या या अधिकाऱ्यांना अतिरीक्त पदभाराच्या ठिकाणी वेळत मिळत नाही. यामुळे हे अधिकारी निमंत्रितासारखे महिन्या दोन महिन्यात एकदाच कार्यालयाकडे फिरकतात. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. आमच्याकडे अतिरीक्त पदभार आहे, असे सांगून अधिकारी मोकळे होतात. हा नेहमीचाच प्रकार होत आहे. मागील वर्षभरापासून मानवत येथील या उपविभागाच्या शाखा अभियंत्याकडे येथील पदभार आहे. त्यांचा कारभार रामभरोसे आहे. ते या कार्यालयात कधीच उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे कामाची गुणवत्ता यावरून दिसून येते. पर्यायाने उपविभागीय कर्मचारीही कार्यालयात फारसे आढळून येत नाहीत.
कर्मचारी नसल्याने कार्यालयात एका खुर्चीवर सेवक बसल्याचे दिसून येते. गुत्तेदार आपल्या गरजेप्रमाणे अभियंत्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपली कामे करून घेतात. प्रत्यक्षात कामाच्या साईटवर कोणाचेही नियंत्रण राहत नसल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.