भक्ती गणेश मंदिरात गणेश जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:04 IST2021-02-16T04:04:26+5:302021-02-16T04:04:26+5:30

औरंगाबाद : श्री भक्ती ट्रस्टच्या एन १ परिसरातील भक्ती गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त दोनदिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

Devotion to Ganesh Jayanti in Ganesh Temple | भक्ती गणेश मंदिरात गणेश जयंती उत्साहात

भक्ती गणेश मंदिरात गणेश जयंती उत्साहात

औरंगाबाद : श्री भक्ती ट्रस्टच्या एन १ परिसरातील भक्ती गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त दोनदिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी गणेश जयंती उत्सवाने या सोहळ्याची सांगता झाली. दरम्यान, रविवारी सहस्त्र मोदक हवन सोहळा पार पडला. त्यानंतर सोमवारी श्री गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तनाने कार्यक्रमांना सुरूवात झाली. दुपारी १२ वाजता भाविकांच्या उपस्थितीत गणेश जन्मोत्सवाचा सोहळा पार पडला, ३ वाजता श्री सत्यविनायक पूजा त्यानंतर सायंकाळी ६ वाजता श्रींची आरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले.

एस. एम. कुलकर्णी, नरेंद्र पाटील, जयंत रानडे, श्रीकांत पत्की यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. दिवसभर भाविकांनी मोठ्या संख्येने गणरायाचे दर्शन घेतले.

फोटो ओळ :

गणेश जयंतीनिमित्त एन १ येथील भक्ती गणेश मंदिरात भाविकांची दिवसभर गर्दी होती.

Web Title: Devotion to Ganesh Jayanti in Ganesh Temple