शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis : आजही मीच मुख्यमंत्री, फडणवीसांच्या विधानावर पंकजांची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 17:39 IST

माझ्या पाठिशी भाजपचे सर्व नेते उभे आहेत. सर्वजण माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस असं जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही.

ठळक मुद्देही चांगली गोष्ट आहे, जर एखाद्या व्यक्तीला तसं वाटत असेल, लोकांचं तेवढं प्रेम मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, असे पंकजा यांनी म्हटलं.

औरंगाबाद - मला आजही मीच राज्याचा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. नवी मुंबईत आयोजित महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभासाठी उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांनी आजही आपणच राज्याचे मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं म्हटलं आहे. त्यावर, आता माजीमंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

"माझ्या पाठिशी भाजपचे सर्व नेते उभे आहेत. सर्वजण माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस असं जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे महत्त्वाचं आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्याच्यामुळे मला कधीही जनतेनंही हे जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पंकजा मुंडे औरंगाबाद येथे भाजपच्या ओसीबी मेळाव्याला आल्या होत्या. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना पंकजा म्हणाल्या की, ही चांगली गोष्ट आहे, जर एखाद्या व्यक्तीला तसं वाटत असेल, लोकांचं तेवढं प्रेम मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, असे पंकजा यांनी म्हटलं. तसेच, पत्रकाराने जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा प्रतिप्रश्न केल्यावर, तुम्ही जनतेच्या मनातील हा शब्द खेचू शकत नाही, असेही पंकजा यांनी म्हटलं.  

पंकजांकडून फडणवीसांचं कौतुक 

आता एक नवीनच षड्यंत्र सुरू झालंय. बहुजनाची व्याख्या खराब करण्याचं हे षड्यंत्र आहे. इकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उचलला की, तिकडे कोणीतरी षड्यंत्रकारी लोक मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा काढतात. अरे मराठा समाजाच्या पाठीवर खंजीर खुपसण्याचं कामही तुम्हीच केलंय. मराठा समाजाला आरक्षण ज्या मुख्यंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढत होतात, त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंय, असे म्हणत पंकजा यांनी एकप्रकारे फडणवीसांच्या कामाचं कौतुकच केलं. 

मी पुन्हा येईन

"राज्याचा विरोधी पक्षनेते म्हणून मी चांगलं काम करतो आहे. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्यादिवशी पहिल्यांदा मी इथंच गोवर्धनी मातेजवळच आशीर्वाद घ्यायला येणार आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याचं काही कारण नाही. मी नक्की याठिकाणी येईन आणि तुमचं निमंत्रण मी आजच स्वीकारतो", असंही फडणवीस पुढे म्हणाले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करण्यात आलेल्या विविध सेवासुविधांचे फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडेChief Ministerमुख्यमंत्रीAurangabadऔरंगाबाद