झुंजार वैष्णव वारकरी प्रबोधन मंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी घडामोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:05 IST2021-06-29T04:05:11+5:302021-06-29T04:05:11+5:30

वार्षिक सभेत सुरुवातीला संंघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत रावसाहेब दारकोंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रदेश सचिव हभप ज्ञानेश्वर महाराज साठे ...

Developments as State President of Jhunjar Vaishnav Warkari Prabodhan Mandal | झुंजार वैष्णव वारकरी प्रबोधन मंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी घडामोडे

झुंजार वैष्णव वारकरी प्रबोधन मंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी घडामोडे

वार्षिक सभेत सुरुवातीला संंघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत रावसाहेब दारकोंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रदेश सचिव हभप ज्ञानेश्वर महाराज साठे यांनी भगवान घडामोडे यांच्या नावाचा प्रस्ताव सुचविला. त्यास हभप महेश महाराज निनाळे व शाहीर वाल्मीक लाड यांनी अनुमोदन दिले. या प्रस्तावास सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली. यावेळी हभप महेश महाराज निनाळे, शालिनी बुंधे, अशोक दामले, मारोती महाराज आगलावे, पांडुरंग महाराज वाघ, सुबोध दारकोंडे, विष्णू महाराज मुळे, अर्जुन महाराज पांचाळ, विजय महाराज रत्नपारखे, उमाकांत सदाफुले, भास्कर महाराज सावदेकर, पुष्पाताई महाराज जाधव, सोमनाथ महाराज भालेराव, राम भगुरे, गिरीष महाराज मोताळे, ॲड. पंकज बनसोडे, शीतलताई महाराज जोशी, रेखाताई सपवते, जनार्धन महाराज पुंड, नितीन सोनवणे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अशोक दामले आणि आभार वाल्मीक कराड यांनी मानले.

Web Title: Developments as State President of Jhunjar Vaishnav Warkari Prabodhan Mandal