शेवटच्या घटकापर्यंतचा विकास हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:53 IST2017-08-28T00:53:35+5:302017-08-28T00:53:35+5:30
समाजातील दुरावा कमी करण्यासाठी सुशिक्षितांनी मागासलेल्या समाज घटकांत शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करावी. वाढता अत्याचार रोखण्यासाठी आता अन्यायाविरुद्ध चर्मकार उठाव संघातर्फे काम करण्याचा निर्धार दुसºया अधिवेशनात करण्यात आला आहे.

शेवटच्या घटकापर्यंतचा विकास हवा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : समाजातील दुरावा कमी करण्यासाठी सुशिक्षितांनी मागासलेल्या समाज घटकांत शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करावी. वाढता अत्याचार रोखण्यासाठी आता अन्यायाविरुद्ध चर्मकार उठाव संघातर्फे काम करण्याचा निर्धार दुसºया अधिवेशनात करण्यात आला आहे.
संत तुकाराम नाट्यमंदिरात महापौर भगवान घडमोडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच संत रविदास, फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री तथा आ. संजय सावकारे, माजी आ. बाबूराव माने, लहू कानडे, अप्पर आयुक्त विजयकुमार फड, अंकुश कानडे, मनाली गवळी, रविकिरण घोलप, प्रदेश सरचिटणीस मोतीलाल आहिरे, अशोक आम्ले, स्वागताध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आदींची उपस्थिती होती.
समाजात विषमता वाढू देऊ नका, कष्टाने व शिक्षणाने ऐश्वर्य मिळविले असले तरी समाजाच्या शेवटच्या घटकाकडेही वळून पाहिले पाहिजे. समाजाला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा, असेही आ. संजय सावकारे म्हणाले. शैक्षणिक प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यास समाजानेही हातभार लावला पाहिजे. शासनाकडून मोठे वसतिगृह उभारण्यात येत आहे, असे सावकारे म्हणाले.
उद्योगवाढीवर लक्ष द्या...
समाजातील युवकांच्या शैक्षणिक, रोजगारवाढीसाठी पहिले लक्ष द्यावे, विषमता दूर झाली तर समाजाला विकासाच्या वाटा सापडतात. एकात्मतेचा लढा यश मिळवून देतो हे निश्चित मानावे लागेल, असे महापौर घडमोडे यांनी सांगितले. अप्पर आयुक्त विजयकुमार फड यांनी दोहा सादर केला तर ग्रामीण उपाधीक्षक अशोक आम्ले मतभेद टाळून प्रगती साधण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असा सल्ला दिला.