बिहारी जनतेचा विकासाला कौल
By Admin | Updated: November 8, 2015 23:46 IST2015-11-08T23:46:00+5:302015-11-08T23:46:00+5:30
लातूर : बिहार विधानसभा निवडणुकीचा जनतेचा कौल समोर आल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन, गांधी चौक आणि राजीव गांधी चौकात

बिहारी जनतेचा विकासाला कौल
लातूर : बिहार विधानसभा निवडणुकीचा जनतेचा कौल समोर आल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन, गांधी चौक आणि राजीव गांधी चौकात रविवारी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. बिहारी जनतेने विकासाला कौल दिला असल्याच्या भावना पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही हा कौल विकासाला असल्याचे मत व्यक्त केले. केंद्रातील भाजपा सरकारने वर्षभरात केलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा राग मतपेटीतून व्यक्त झाला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली, तर भाजपाने मोदींचे उत्तुंग नेतृत्व बिहारी जनतेला समजले नसल्याची प्रतिक्रिया नोंदविली.