देवानंद शिंदे यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 12:57 IST2019-06-03T12:56:33+5:302019-06-03T12:57:55+5:30

शिंदे यांनी सावित्रीबाई' फुले पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी सुद्धा कार्य केले आहे .

Devanand Shinde has got extracharge of Vice Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad | देवानंद शिंदे यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार

देवानंद शिंदे यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार

औरंगाबाद :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदाचा अतिरिक्त प्रभार कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. 

डॉ. देवानंद शिंदे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केमिकल टेक्नोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख होते. यानंतर त्यांची निवड कोल्हापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी झाली. यासोबत शिंदे यांनी सावित्रीबाई' फुले पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी सुद्धा कार्य केले आहे .

कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार मिळाल्यामुळे आंनद झाला असून कुलसचिव कार्यालयाचा संपर्क होताच पदभार स्वीकारण्यासाठी आपण तत्काळ औरंगाबादच्या दिशेने रवाना  होऊ अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे. 

Web Title: Devanand Shinde has got extracharge of Vice Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad