केलेली कामे सोशल मीडियातून सांगा
By Admin | Updated: July 20, 2014 01:01 IST2014-07-20T00:55:37+5:302014-07-20T01:01:29+5:30
औरंगाबाद : जनतेची केलेली कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगा व लोकांसमोर ठेवा, असे आवाहन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

केलेली कामे सोशल मीडियातून सांगा
औरंगाबाद : जनतेची केलेली कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगा व लोकांसमोर ठेवा, असे आवाहन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
युवा सेनेच्या मराठवाडा विभागीय जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी तापडिया नाट्यमंदिरात झाली. तीत ते बोलत होते. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मेळाव्याचे दीप प्रज्वलनाने उद््घाटन झाले.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. निवडणूक लक्ष्य समोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, गाव तेथे शाखा स्थापन करावी, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी अमोल कीर्तीकर, अमेय घोले, पवन जाधव, अंकित प्रभू, श्रीकांत पंडित, राजेंद्र जंजाळ, विश्वास राजपूत, जिल्हा युवाधिकारी ऋषिकेश खैरे, संतोष माने, मिथून व्यास, जिल्हा युवाधिकारी भाऊसाहेब घुगे (जालना), भरत सांबरे, अंकुश पाचफुले, रोहित बाविस्कर, बाळू सातोरे (नांदेड), दिलीप घुगे, बाजीराव सवंडकर (हिंगोली), सूरज साळुंके (उस्मानाबाद), सुशील पिंगळे, अभिजित बरिंदे (बीड), श्रीनिवास रेंगे पाटील, संदीप राठोड (परभणी), सूरज डांबरे (लातूर) उपस्थित होते.