शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर; पीडितेची विनंती मान्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 11:43 IST

अतिरिक्त सत्र न्यायाधीश अंजली खडसे यांनी श्रीरामे यांना मंजूर करण्यात आलेला अटकपूर्व जामीन रद्द केला.

औरंगाबाद : औरंगाबाद परिमंडळ-२ चे तत्कालीन पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना मंजूर केलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्याची विनंती करणारा पीडितेचा अर्ज सोमवारी (दि.२४ सप्टेंबर) अतिरिक्त सत्र न्यायाधीश अंजली खडसे यांनी मंजूर करीत श्रीरामे यांना मंजूर करण्यात आलेला अटकपूर्व जामीन रद्द केला. अटकपूर्व जामीन मंजूर करताना सत्र न्यायालयाने घातलेल्या अटी शिथिल करण्याबाबत श्रीरामे यांनी दाखल केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला. 

मात्र, या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याच्या श्रीरामे यांच्या वतीने करण्यात आलेल्या विनंती अर्जाचा विचार करून न्यायालयाने वरील आदेशाला १५ दिवसांची अंतरिम स्थगिती दिली असल्याचे श्रीरामे यांच्या वकिलांनी सांगितले. 

प्रकरणाची पार्श्वभूमी      एका तरुणीने २२ जून २०१८ रोजी पोलीस आयुक्तालयाच्या तक्रार निवारण केंद्राच्या ‘व्हॉटस्अ‍ॅप’ नंबरवर श्रीरामे यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने २७ जून रोजी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात श्रीरामे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अटकपूर्व जामीन        या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून त्यांनी ७ जुलै रोजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. दर मंगळवार व शनिवारी सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान तपास अधिकाऱ्याकडे हजेरी लावावी, तसेच तपासात सहकार्य करावे, या अटींवर न्यायालयाने श्रीरामे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता. त्यानंतर श्रीरामे आणि पीडितने दाखल केलेल्या अर्जांवर वरीलप्रमाणे आदेश देण्यात आला.  पीडितेच्या वतीने अ‍ॅड. राजेश काळे, तर श्रीरामे यांच्या वतीने अ‍ॅड. गोपाल पांडे आणि अ‍ॅड. बी.आर. पांडे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. किरण कुलकर्णी आणि अ‍ॅड. रूपा साकला यांनी सहकार्य केले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील बाळासाहेब महेर यांनी काम पाहिले.

पीडितेच्या वतीने अ‍ॅड. राजेश काळे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, श्रीरामे यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून न्यायालयाची दिशाभूल करून जामीन मंजूर करून घेतला. तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे आणि कैलास प्रजापती यांनी वस्तुस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही. त्यांच्या धमक्यांमुळे पीडिता आणि तिच्या आईला पोलिसांसमोर येता आले नाही. तर अ‍ॅड. पांडे यांनी न्यायालयास विनंती केली की, श्रीरामे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना घातलेल्या अटींची त्यांनी पूर्तता केली आहे. आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ त्यांनी श्रीरामे यांची हजेरीची डायरी सादर केली. केवळ त्यांची मुंबईला बदली झाल्यामुळे अटी शिथिल कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली. सुनावणीअंती पीडितेची उपस्थित केलेल्या मुद्यांचा विचार करून न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी