शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्राचा बोजवारा

By admin | Updated: March 26, 2015 00:54 IST

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील ४० खेडेगावांचा संपर्क असलेले कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील ४० खेडेगावांचा संपर्क असलेले कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे मंजूर असलेल्या आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रात्री काही अडचण आल्यास रुग्णांना घनसावंगी, अंबड येथील रुग्णालयात पाठवावे लागते. दोन दिवसांपूर्वी पाडुळी फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात घडला होता. अपघातामुळे वाहनचालकाच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन व्यक्तींना शनिवारी रात्री ७.३० ला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परंतु दवाखान्यात कोणीच उपलब्ध नसल्याने सुमारे ८ वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाट पहात बसावे लागले. परंतु वैद्यकीय अधिकारी न आल्याने त्या रुग्णांना खाजगी वाहनातून जालन्याकडे हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात हजर नसल्याने मागील अनेक दिवसांपासून ओपीडी विभाग बंदच आहे. वैद्यकीय अधिकारी हजर राहावा , अशी मागणी गावकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. तर रुग्णांना योग्य ती सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.