विभागीय वार्धक्यशास्त्र केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:04 IST2021-06-24T04:04:56+5:302021-06-24T04:04:56+5:30
शहरात होण्यासाठी पाठपुरावा भागवत कराड : ज्येष्ठांच्या सक्षमीकरणासंदर्भातील माहिती पुस्तिकेचे प्रकाशन औरंगाबाद : विभागीय वार्धक्यशास्त्र म्हणजे जेरियाट्रिक्स सेंटर औरंगाबादला ...

विभागीय वार्धक्यशास्त्र केंद्र
शहरात होण्यासाठी पाठपुरावा
भागवत कराड : ज्येष्ठांच्या सक्षमीकरणासंदर्भातील माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
औरंगाबाद : विभागीय वार्धक्यशास्त्र म्हणजे जेरियाट्रिक्स सेंटर औरंगाबादला व्हावे, यासाठी घाटी प्रशासनाने प्रस्ताव पाठविलेला आहे. हे केंद्र औरंगाबादला होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, असे खा. डाॅ. भागवत कराड म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट फोनसह इतर तंत्राविषयी प्रशिक्षण आणि सक्षमीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) फिजिऑलाॅजी हाॅलमध्ये आयोजित कार्यक्रमात झाले. याप्रसंगी खा. डाॅ. कराड बोलत होते. याप्रसंगी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्राॅनिक्स ॲण्ड इन्फाॅरमेशन टेक्नाॅलाॅजीचे कार्यकारी संचालक डॉ. संजीवकुमार गुप्ता, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वार्धक्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. मंगला बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती
‘नाईलिट’तर्फे स्मार्ट फोनसह आयसीटी उपकरणांद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी औरंगाबादसह अकोला, नाशिक, नंदुरबार आणि ठाणे या पाच जिल्ह्यात ३०० कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड, डाॅ. प्रभा खैरे, डाॅ. गजानन सुरवाडे, डाॅ. अविनाश लांब आदी उपस्थित होते.
फोटो ओळ...
ज्येष्ठांच्या सक्षमीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी वार्धक्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डाॅ. मंगला बोरकर, अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, खा. डाॅ. भागवत कराड, डॉ. संजीवकुमार गुप्ता.