हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग ओस
By Admin | Updated: June 2, 2014 01:08 IST2014-06-02T01:04:06+5:302014-06-02T01:08:44+5:30
जिंतूर : खरीपपूर्व हंगामात विविध बियाणे तसेच कीटकनाशके, माती परीक्षण, पिकांची निवड यावर मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याऐवजी

हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग ओस
जिंतूर : खरीपपूर्व हंगामात विविध बियाणे तसेच कीटकनाशके, माती परीक्षण, पिकांची निवड यावर मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याऐवजी तब्बल १५ ते २० दिवसांपासून या कार्यालयात एकही अधिकारी हजर राहत नसल्याचे चित्र आहे. येथील तालुका कृषी कार्यालय हे गावापासून तीन कि.मी.अंतरावर आहे. कार्यालयाचा कारभार सेलू येथील तालुका कृषी अधिकारी रोडगे यांच्याकडे देण्यात आला आहे. प्रभारी कारभार असल्याने रोडगे महिन्यातील मोजक्याच दिवशी जिंतुरात येतात. कार्यालयप्रमुखच येत नसल्याने इतर अधिकार्यांना तर रान मोकळे झाले आहे. मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक यांचा तर कार्यालयात पत्ताच नसतो. विशेष म्हणजे अवघ्या आठ दिवसांवर खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. या हंगामात शेतकर्यांना विविध बियाणांच्या संदर्भात खत- कीटकनाशक, माती परीक्षण, पीक पद्धती व वातावरणाशी समरस होत कोणती पिके कोणत्या भागात घ्यावीत, यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. परंतु, या विभागातील अधिकार्यांना मार्गदर्शनाऐवजी विविध कामे असतील तरच कार्यालयात यावेसे वाटते. संबंधित मंडळ अधिकारी व पर्यवेक्षक तसेच कृषी सहाय्यक साईड व्हीजीटच्या नावाखाली महिना -महिना गायब असतात. त्यामुळे शेतकर्यांना वार्यावर सोडण्याचे काम या विभागाकडून होत आहे. (वार्ताहर) तालुका कृषी कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकार्यावर असल्याने कार्यालयावर कोणाचेही नियंत्रण नाही. ६० ते ७० कर्मचारी असलेल्या कार्यालयात केवळ तीन ते चार व्यक्ती हजर असतात. परिणामी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकर्यांना विविध योजनांची माहिती, अनुदानाची माहिती, शेती औजाराची माहिती घेता येत नाही. अधिकारी कायमस्वरुपी नसल्याने कर्मचारीही उंटावरुन शेळ्या राखण्याचे काम करत आहेत. या कर्मचार्यांना कोणाचेही देणे-घेणे नाही. या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकार्याची गरज येथील कार्यालयास आहे.