साताऱ्यात आढळला डेंग्यूचा एक रुग्ण
By Admin | Updated: August 6, 2014 02:35 IST2014-08-06T02:27:41+5:302014-08-06T02:35:08+5:30
औरंगाबाद : डेंग्यूने डोके वर काढल्याने शहर व जिल्हाभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

साताऱ्यात आढळला डेंग्यूचा एक रुग्ण
औरंगाबाद : डेंग्यूने डोके वर काढल्याने शहर व जिल्हाभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सातारा येथे एका ३२ वर्षीय व्यक्तीला डेंग्यूने ग्रासले असून त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत, तर सातारा गाव परिसरात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी औषधी वाटप व साठवलेल्या पाण्यात डेंग्यूची अंडी मारण्यासाठी औषध टाकण्याचे काम हाती घेतले असले तरी अजून किती रुग्ण आढळतात, याबाबत नागरिकांत भीती आहे.
सातारा ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाने दिलेली फॉगिंग मशीन बंद पडल्याने डास निर्मूलन व नागरिकांचे आरोग्य छोट्या मशीनवरच अवलंबून आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या मशीनमध्ये बिघाड झाला असून तिची दुरुस्ती ही पुण्यातच होते. ग्रामपंचायतीचे एक यंत्र दुरुस्तीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून, दक्षता म्हणून नवीन मशीनची मागणी आरोग्य विभागाकडे केली असली तरी अद्याप मशीन साताऱ्यात आलेली नाही. मुळात सामान्यत: प्लेटलेट साडेचार लाखांजवळ असाव्यात त्यासाठी डॉक्टरांचे पथक प्रयत्न करीत आहे.
सातारा गावात आरोग्य विभागाच्या पथकाने शिबीर घेऊन गावात जनजागृतीचे काम हाती घेऊन फॉगिंग मशीन तात्काळ द्यावी, अशी मागणी आरोग्य अधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषद सदस्या योगिता रमेश बाहुले, एम. बी. पटेल यांनी केली आहे.