हंडरगुळीत आढळला डेंग्यूचा रुग्णहाळी
By Admin | Updated: August 25, 2014 01:38 IST2014-08-25T00:49:14+5:302014-08-25T01:38:27+5:30
हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे डेंग्यू हातपाय पसरु लागला आहे़ काही दिवसापूर्वीच लागण झालेली एक ७ वर्षीय मुलगी आजारातून बरी होते न होते तोच

हंडरगुळीत आढळला डेंग्यूचा रुग्णहाळी
हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे डेंग्यू हातपाय पसरु लागला आहे़ काही दिवसापूर्वीच लागण झालेली एक ७ वर्षीय मुलगी आजारातून बरी होते न होते तोच एका १९ वर्षीय युवकास डेंग्युने घेरले आहे़
हंडरगुळीत सध्या डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ त्यामुळे नागरिकांना विविध आजारास सामोरे जावे लागत आहे़ काही दिवसांपूर्वीच एका ७ वर्षीय मुलीला डेंग्युची लागण झाली होती़ तिच्यावर लातूरला उपचार केल्यानंतर ती बरी झाली़ मात्र यापाठोपाठ गावातीलच श्याम गोविंद खोडेवाड या युवकास आता डेंग्युची लागण झाली आहे़ ताप चढल्याने तो येथीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता़ मात्र, डेंग्यूची लागण झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्यास उपचारासाठी उदगीरला पाठविण्यात आले आहे़
यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ़एम़एस़ कारामुंगे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, डासांच्या प्रादुर्भावामुळे आजाराची लागण होत आहे़
सरपंच शत्रुघ्न गायकवाड यांनी पत्र मिळाल्याचे सांगून तातडीने स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येत असल्याचे सांगितले़ (वार्ताहर)