डेंग्यूचा फैलाव
By Admin | Updated: August 25, 2016 23:49 IST2016-08-25T23:47:21+5:302016-08-25T23:49:55+5:30
औरंगाबाद : शहरात डेंग्यू साथरोगाचा फै लाव होण्यास सुरुवात झाली आहे.

डेंग्यूचा फैलाव
औरंगाबाद : शहरात डेंग्यू साथरोगाचा फै लाव होण्यास सुरुवात झाली आहे. पुंडलिकनगर परिसर, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, अंबिकानगर, रोशनगेट, कटकटगेट, नागेश्वरवाडी या भागांमध्ये तापाच्या रुग्णांची गर्दी स्थानिक दवाखान्यांमध्ये आढळून येत आहे.
गारखेडा परिसरातील काही खाजगी रुग्णालयांतील रुग्णांचे रक्त तपासणीचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आले आहेत. तीन रुग्णांचे अहवाल डेंग्यूसदृश आले आहेत.
शिवाजीनगर ११ व्या योजनेत राहणाऱ्या संकेत पवार (१२ वर्षे) आणि शौर्य खरात (५ वर्षे) यांना डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संकेतवर श्रद्धा हॉस्पिटलमध्ये तर शौर्यवर वरद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
आहेत.
महानगर पालिकेकडून धूरफवारणी होत नाही. तसेच अॅबेट औषधी वाटपाचे कामही बंद आहे. डास निर्मूलनासाठी औषधी फवारणी करण्यात येते; परंतु ती फवारणीदेखील काही दिवसांपासून बंद आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे.