‘डेंग्यू कंट्रोल करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:55 IST2017-11-03T00:55:20+5:302017-11-03T00:55:29+5:30
शहर स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करुन गुरुवारपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणावी, नसता उद्भवणा-या परिणामास नगरपालिका जबाबदार राहील अशा शब्दात मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांना जिल्हाधिका-यांनी सुनावले.

‘डेंग्यू कंट्रोल करा’
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात फैलावत चाललेला ताप, डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बीड शहरात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याची बाब पुढे आल्यानंतर शहर स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करुन गुरुवारपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणावी, नसता उद्भवणा-या परिणामास नगरपालिका जबाबदार राहील अशा शब्दात मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांना जिल्हाधिका-यांनी सुनावले. तसेच सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिका-यांना साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी सूचना करण्यात आल्या.
गुरुवारी डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठकीस सीईओ धनराज निला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ.भोकरे, सोळूंके, मधूकर वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिका-यांनी डासांपासून होणाºया डेंग्यूसारख्या आजारावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. धूर फवारणी, अॅबेटींग यासारखे तातडीची प्रतिबंधात्मक उपयायोजना करावी. तसेच तापेचे रुग्ण आढळल्यास तात्काळ आरोग्य पथक पाठवून त्यांची योग्य तपासणी करुन व लक्षणे पाहून औषधोपचार करावा. डासांपासून होणाºया आजारामुळे कोणत्याही रु ग्णाचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. आरोग्य विभागाने डासांपासून होणाºया आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अधिकारी कर्मचारी तसेच आरोग्यसेविका, आशा वर्कर यांची मदत घ्यावी असे जिल्हाधिकारी या वेळी म्हणाले. बैठकीत बीड शहरातील अस्वच्छतेचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला.
या बैठकीस जिल्ह्यातील वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.