शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचे ३ बळी तर साथीचे शेकडो रूग्ण

By admin | Updated: September 20, 2014 23:39 IST

भास्कर लांडे, हिंगोली जिल्ह्यात डेंग्यूने थैैमान घातल्याने तिघांचा बळी गेला. तर साथीच्या आजारांनी ४२२ जणांना बेजार केले.

भास्कर लांडे, हिंगोलीजिल्ह्यात डेंग्यूने थैैमान घातल्याने तिघांचा बळी गेला. तर साथीच्या आजारांनी ४२२ जणांना बेजार केले. अद्यापही साथ आटोक्यात आली नसताना जिल्हा आरोग्य विभागाकडे साथीच्या रूग्णांच्या दैनंदिन नोंदीही होत नाहीत. आजपर्यंत ग्रामीण भागात कहर करणारे हे आजार आता शहरात पाय पसरत आहेत. त्यातच शनिवारी डेंग्यूसदृश्य आजाराने आणखी एक दगावल्याने भीती वाढली आहे. स्वच्छता व शुद्ध पाणीपुरवठ्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.पिंपळदरीत डेंग्यूचा पहिला रूग्ण आढळल्याला आज महिना उलटला. तरीही साथ अटोक्यात येत नाही. उलट वेगवेगळ्या गावांतील रूग्ण समोर येताना दिसतात. दोन दिवसांपूर्वी वटकळी येथील संगीता रमेश शिंदे (वय २६) आणि माझोड येथील गंगाधर वामन मुळे (२२) यांचा डेंग्यूने मृत्यू झाला. दरम्यान, इतर साथीच्या आजारांनीही डोके वर काढले. कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथे सहा जणांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. महिनाभरात ५५ रूग्णांनी सामान्य रूग्णालयात उपचार घेतले. वटकळी आणि इंचा येथे अनुक्रमे १६ रूग्ण तापाने होरपळले. एकूण १२४ रूग्णांनी हिंगोलीत उपचार घेतले. आजारांनी थैमान घातले असता शासकीय यंत्रणा सुस्त आहे. गावात नियमित साफसफाई होत नाही, नाल्या उपसल्या जात नाहीत, रस्त्यावर सांडपाणी येते हेच चित्र शहरी भागातही दिसते. पं.स. व नगरपालिकांना काही देणेघेणे नाही. आजार आला की आरोग्य विभागाकडे बोट दाखवतात. दुसरीकडे आरोग्य विभाग ग्रामपंचायत स्वच्छता ठेवत नसल्याने हे आजार उद्भवल्याचे सांगून हात वर करते. जनजागृतीच्या नावाने पत्ता नसताना साथ आलीच तर त्या गावात सर्वेक्षण केले जाते. दररोज वेगवेगळ्या गावचे रूग्ण समोर येत आहेत. १९ सप्टेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील सवड येथील एकाच तापाने मृत्यू झाल्याचे समोर आले. दोन्हीही सुस्त यंत्रणांचा अनेकांना फटका बसत आहे.