शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचे १४४ संशयीत रूग्ण

By admin | Updated: August 15, 2014 00:06 IST

अनुराग पोवळे, नांदेड जिल्ह्यात १ जानेवारी ते १४ आॅगस्ट या कालावधीत जवळपास १४४ संशयीत रूग्ण आढळले़

अनुराग पोवळे,  नांदेडजिल्ह्यात १ जानेवारी ते १४ आॅगस्ट या कालावधीत जवळपास १४४ संशयीत रूग्ण आढळले़ शासकीय रूग्णालयात त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता त्यापैकी ४० रूग्णांना डेंग्यूची लागण होती़ मात्र उपचारानंतर ते आता ठणठणीत असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ़ एम़ टी़ साळवे यांनी दिली़ उपरोक्त कालावधीत ४ ठिकाणी किटकजन्य आजारांचा उद्रेकही झाला होता़ दुसरीकडे जिल्ह्यात चिकनगुनियाचा एकही रूग्ण आढळला नाही ही बाबही समाधानकारक आहे़जिल्ह्यात जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत १४४ रक्तनमुने तपासले़ त्यातील ४० जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले़ यात एकाही चिकनगुनीयाच्या रूग्ण आढळला नाही़ उपचारानंतर हे रूग्ण बरे झाले आहेत़ मलेरियाचेही ४७ रूग्ण जिल्ह्यात आढळले आहे़ जानेवारी ते जुलैअखेरपर्यंत २७ हजार ९१५ रूग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले होते़ जिल्ह्यात एकाही ठिकाणी हिवताप साथीचा उद्रेक झाला नाही़ जिल्ह्यात किटकजन्य आजारांची साथ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत़ तापाच्या रूग्णांचे रक्तनमुने घेणे, संशयीतांच्या रक्ताची तपासणी, सांडपाणीसाठ्यामध्ये डासअळी तपासणी करणे, दूषित पाणी आढळून आल्यास पाणीसाठे रिकामे करणे, अबेटचा वापर, संशयीत रूग्ण आढळलेल्या गावातील घरामध्ये डास गोळा करून त्याची घनता काढणे, धुरफवारणी तसेच डास होवू नयेत यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत जनतेला मार्गदर्शन करण्यात येत आहे़ तसेच ज्या ठिकाणी आजाराची साथ पसरते तेथे आरोग्य पथकही ठेवण्यात येते़ पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे कीटकजन्य आजारांची शक्यता वाढते़ अशावेळी नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे़ आजारांचा चार ठिकाणी उद्रेकजिल्ह्यात ४ ठिकाणी किटकजन्य आजारांचा उद्रेक आढळून आला आहे़ त्यात नांदेड महापालिका हद्दीतील देगाव चाळ, माहूर तालुक्यातील चोरड, गोंडवडसा आणि लोहा तालुक्यातील पेनूर या ठिकाणांचा समावेश आहे़ नांदेडमधील देगावचाळ व माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथील रूग्ण तर आॅगस्टच्या प्रारंभीच आढळले आहेत़ यापार्श्वभूमीवर महापालिकेने आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत़ तरीही तापीच्या रूग्णांची शहरात मोठी संख्या आढळत आहे़ जिल्हा शासकीय रूग्णालयासह खाजगी रूग्णालयातही अनेकजण उपचार घेत आहे़