उद्या जन आंदोलनाची संघर्ष समितीतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:04 IST2021-06-25T04:04:37+5:302021-06-25T04:04:37+5:30

२६ जूनला कार्यक्रम मराठवाड्यात राबविता यावा म्हणून, कॉ. भीमराव बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात प्रा. अर्जुन ...

Demonstrations by the struggle committee of the mass movement tomorrow | उद्या जन आंदोलनाची संघर्ष समितीतर्फे निदर्शने

उद्या जन आंदोलनाची संघर्ष समितीतर्फे निदर्शने

२६ जूनला कार्यक्रम मराठवाड्यात राबविता यावा म्हणून, कॉ. भीमराव बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात प्रा. अर्जुन जाधव (लातूर), युवराज गटकळ (उस्मानाबाद), कॉ. राजन क्षीरसागर (परभणी), साथी पंडितराव देशमुख (वसमत), प्रा. मोहन परजणे (बीड), प्रा. संजय लकडे (जालना), कॉ. भगवान भोजने, कॉ. अश्फाक सलामी, कॉ. अभय टाकसाळ, कॉ. श्रीकांत फोपसे, कॉ. बुद्धिनाथ बराळ, प्रा. उमाकांत राठोड, कॉ. शिंदे, साथी सुभाष लोमटे (औरंगाबाद) आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार कृती समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमात अखिल भारतीय किसान संघर्ष समिती, जन आंदोलनाची संघर्ष समिती, महाराष्ट्र, संयुक्त कामगार कर्मचारी कृती समिती व सर्व परिवर्तनवादी कामगार, शेतकरी, शेतमजूर संघटना, विद्यार्थी, युवक व महिला संघटना सहभागी होणार आहेत.

Web Title: Demonstrations by the struggle committee of the mass movement tomorrow