चित्रफीत दाखवून शरीरसुखाची मागणी

By Admin | Updated: September 7, 2014 00:42 IST2014-09-07T00:37:59+5:302014-09-07T00:42:17+5:30

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरला तेथीलच एक डॉक्टर अश्लील चित्रफीत दाखवून गेल्या अनेक महिन्यांपासून शरीरसुखाची मागणी करीत होता.

Demonstrate demand for bodybuilding by showing the video | चित्रफीत दाखवून शरीरसुखाची मागणी

चित्रफीत दाखवून शरीरसुखाची मागणी

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरला तेथीलच एक डॉक्टर अश्लील चित्रफीत दाखवून गेल्या अनेक महिन्यांपासून शरीरसुखाची मागणी करीत होता. डॉक्टराच्या या चाळ्यांना वैतागलेल्या महिलेने शनिवारी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
त्यावरून गुन्हा दाखल करून हे कृत्य करणाऱ्या डॉ. अतुल गणपत भालेराव (रा. चेतक घोड्याजवळ, जवाहर कॉलनी) याला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली.
घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील रहिवासी असलेली एक महिला घाटी रुग्णालयात डॉक्टर होती. तिच्याच विभागात आरोपी डॉ. भालेराव हाही त्यावेळी कार्यरत होता. ड्यूटीच्या वेळी हा तिला अश्लील चित्रफीत दाखवीत असे. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. नंतर मात्र, भालेराव तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करू लागला. त्याच्या या चाळ्याला ती वैतागून गेली होती. तो तिच्या घरीही येऊन चाळे करू लागला.
हा प्रकार महिलेच्या पतीला समजला. तेव्हा पतीने त्याला जाब विचारला असता भालेरावने तिला व तिच्या पतीलाही मारहाण केली. शेवटी या महिलेने जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले आणि विनयभंगाची फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल केल्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी या आरोपी डॉ. भालेरावला अटक केली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Demonstrate demand for bodybuilding by showing the video