सत्यशोधक संघटनेच्या विद्यार्थ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:54+5:302021-02-06T04:07:54+5:30
औरंगाबाद : सत्यशोधक विद्यार्थी_संघटनेच्या शिष्टमंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन ‘पेट’ बाबत ...

सत्यशोधक संघटनेच्या विद्यार्थ्यांची मागणी
औरंगाबाद : सत्यशोधक विद्यार्थी_संघटनेच्या शिष्टमंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन ‘पेट’ बाबत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ‘पेट’च्या पहिला पेपरच्यावेळी ग्रामीण भागातील इंटरनेट सेवेत सतत अडचणी आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिला पेपर सोडविताना व्यत्यय आला व कमी गुण पडले आहेत. त्यामुळे पहिल्या पेपरला ३५ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पात्र ठरवून दुसरा पेपर देण्याची संधी द्यावी, ‘पेट’चा दुसरा पेपर ऑफलाईन घ्यावा, पहिला आणि दुसऱ्या पेपरचे गुण ग्राह्य धरूनच पीएच.डी.साठी प्रवेश द्यावा आदी मागण्यांचे निवेदन प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांना सादर करण्यात आले. यावेळी अमोल खरात, रामेश्वर मुळे, संदीप तुपसमिंद्रे, प्रितम मोरे, सिद्धांत सोनवणे, ऊजमा शेख, कादर शेख, निशा गायकवाड, मयुरी जोगदंड, बळीराम चव्हाण, सुलभा भालेकर, राधा मोरे, सारिका दळवी आदी विद्यार्थी उपस्थित होते.