खुलताबादेत ट्रॉमा केअर युनिटला मंजुरी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:04 IST2021-09-13T04:04:45+5:302021-09-13T04:04:45+5:30
निवेदनात म्हटले आहे की, खुलताबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहेत. सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय दौलताबाद, खुलताबाद, ...

खुलताबादेत ट्रॉमा केअर युनिटला मंजुरी देण्याची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, खुलताबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहेत. सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन आदी पर्यटन व धार्मिक स्थळे असल्यामुळे वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे सतत होणाऱ्या अपघातांमुळे खुलताबाद ट्राॅमा केअर सेंटरची गरज आहे. ९ मे २०१९ रोजी पुन्हा एकदा खुलताबाद येथील ट्राॅमा केअर सेंटर मंजुरीसाठीचा प्रस्ताव पाठविला गेला. परंतु याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा बळी गेला आहे.
---
फोटो : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देताना नगरसेवक मिर्झा अयाज बेग व नगरसेविका रुख्मणबाई फुलारे.
120921\img-20210911-wa0058.jpg
खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्यात यावे यामागणीचे निवेदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देतांनी नगरसेवक मिर्झा अयाज बेग व नगरसेविका रूख्मणबाई फुलारे