नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्यात पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:19+5:302021-02-05T04:08:19+5:30
वीरगाव : वैजापूर, गंगापूर तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्याला रब्बी हंगामासाठी तत्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी ...

नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्यात पाणी सोडण्याची मागणी
वीरगाव : वैजापूर, गंगापूर तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्याला रब्बी हंगामासाठी तत्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी रयत शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. उपविभागीय अधिकारी व कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना बुधवारी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव व नगर जिल्ह्यांना विना मागणी तत्काळ पाणी सोडण्यात येते. तर वैजापुर गंगापुर तालुक्यातील नामका कालवा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असून देखील पाणी सोडण्याबाबत निर्णय का घेतला जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. लवकरात लवकर बैठक घेऊन तत्काळ पाणी सोडण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलनं छेडण्याचा इशारा यावेळी शेतकर्यांनी दिला आहे. याप्रसंगी रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईसाक रशिद पटेल, युवक आघाडी अँड. गुलाम मोहयोदीन शेख, जिल्हाध्यक्ष विधी व न्यायविभाग युवा आघाडी सागर गायके, दत्तु रक्टाटे, काशिनाथ सोमवंशी, अमोल तागड, एकनाथ जाधव, अशोक सोमवंशी, दिनकर गायके, गिरजाबाल सोमवंशी, कृष्णा सोमवंशी, पप्पु जगताप, कल्याण सोमवंशी, बाबासाहेब सोमवंशी, रामदास जाधव, ईनुस मिस्तरी, बालु महाले, विनोद महाले, जाकीर शेख, दीपक जाधव, रसुल शेख आदींची उपस्थिती होती.