वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी

By Admin | Updated: July 20, 2015 00:54 IST2015-07-20T00:17:55+5:302015-07-20T00:54:14+5:30

बीड / उमापूर: गेवराई तालुक्यातील उमापूर प्राथमिक आरोग्य केंंद्रात प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

The demand for registering a crime against the medical officer | वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी

वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी


बीड / उमापूर: गेवराई तालुक्यातील उमापूर प्राथमिक आरोग्य केंंद्रात प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी रविवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली.
उज्ज्वला प्रकाश कवडे (वय २०) ही महिला पहिल्याच बाळंतपणासाठी उमापूर प्रा. आरोग्य केंंद्रात बुधवारी दाखल झाली होती. गुरुवारी त्यांनी मुलाला जन्म दिला. मात्र, रक्तस्त्राव न थांबल्याने त्यांना दुसऱ्या दवाखान्यात हलविण्याचा प्रयत्न झाला. यावेळी वाटेतच बाळासह मातेने प्राण सोडले. चकलांबा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. प्रसुतीवेळी वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते, नर्सनेच औषधोपचार केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाचेच हे बळी असल्याचा आरोप नातेवाईकांसह कार्यकर्र्त्यांनी केला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी रविवारी संग्राम आहेर, धर्मराज आहेर, महादेव बन्सोडे, सुजित देशमुख, दत्ता जाधव, जयदीप औटी, किरण खरात, डॉ. संजय औटी, सुमन वीर, नितीन पवार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The demand for registering a crime against the medical officer