शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

किंमतीत वाढ होऊनही मागणी जोरात

By admin | Updated: February 18, 2015 00:42 IST

बीड : महाशिवरात्रीनिमित्त फराळासाठी बाजारात विविध प्रकारचे फळे, पदार्थ विक्रीसाठी आले होते. गतवर्षीच्या तुलनेत फराळाच्या पदार्थांचे भाव वाढले

बीड : महाशिवरात्रीनिमित्त फराळासाठी बाजारात विविध प्रकारचे फळे, पदार्थ विक्रीसाठी आले होते. गतवर्षीच्या तुलनेत फराळाच्या पदार्थांचे भाव वाढले असले तरी मागणी मात्र जोरात असल्याचे मंगळवारी दिसून आले.यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे पिकांच्या उत्पादनात तर घट झालीच आहे, शिवाय फळ बागांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. गतवर्षी पेंडखजूर ६० रूपये किलो प्रमाणे विक्री केला जात होता, मात्र यावर्षी यामध्ये २० रूपयाने वाढ होऊन तो ८० रूपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री करण्यात आला. कच्चा खारकाचे भाव अधिक असल्यामुळे पेंडखजूरचे भाव वाढल्याचे मुज्जू आत्तार या विक्रेत्याने सांगितले.परराज्यातून ही पेंडखजूर आणण्यात आली होती. तसेच शहरात ५० ते ६० ठिकाणी हातगाडे विक्रेते पेंडखजूर विक्रीसाठी घेऊन बसले होते. तसेच इतर फळे व पदार्थांनाही नागरिकांमधून चांगली मागणी असल्याचे इक्बाल बागवान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केळी : ४० रूपये डझनद्राक्षे :४० ते ६० रू.किलोखरबुज : ३० ते ४० रूपयेडाळींब : ५० ते ६० रू. किलोरताळे : २० ते ३० रू. किलोसफरचंद : ७० ते १०० रू. किलोअल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रताळ्याचे उत्पादन फारसे निघाले नाही. मात्र काही शेतकऱ्यांनी मेहनत करून पिक काढले होते. बाजारात काही ठिकाणीच रताळे विक्रीसाठ ीआले होते. त्याठिकाणी मात्र नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.फळांबरोबरच तळलेला साबुदाणा खरेदी करून भूक भागविण्यावरही भाविकांनी पसंती दिली.४साबुदाण्याच्या भावातही पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे दुकानदार उमेश आजबे यांनी सांगितले.४बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले.४शहरातील भाजीमंडई परिसरात चारही रस्ते फळविक्रेते व पदार्थ विक्रेत्यांनी व्यापले होते. तसेच खरेदीसाठी भाविकांची उडालेली झुंबड यामुळे मंडई परिसरात गर्दी दिसून आली.४अंबाजोगाई, परळी, माजलगाव येथील बाजारपेठाही गर्दीने गजबजलेल्या होत्या.