खुलताबाद ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:05 IST2021-04-05T04:05:02+5:302021-04-05T04:05:02+5:30
खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी भेट देऊन कोरोनाबाबत आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर ...

खुलताबाद ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी
खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी भेट देऊन कोरोनाबाबत आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर यांनी, खुलताबाद शहर हे धार्मिक व पर्यटनस्थळ असून या ठिकाणी नेहमी पर्यटक व भाविकांची गर्दी असते. खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असून या ठिकाणी रिक्त असलेली पदे भरण्यात यावीत, तसेच रुग्णालयात उपचारासाठी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी केली.
यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे करताना नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर.