लाचेची मागणी; सरपंच पतीसह ग्रामसेवक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:04 IST2021-04-10T04:04:51+5:302021-04-10T04:04:51+5:30
औरंगाबाद: विहीर मंजुरीसाठी आवश्यक ग्रामपंचायतचा ठराव देण्यासाठी शेतकऱ्याकडे ३० हजार रुपये लाच मागणाऱ्या जांभाळा गावाच्या ग्रामसेवकासह मध्यस्थाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक ...

लाचेची मागणी; सरपंच पतीसह ग्रामसेवक ताब्यात
औरंगाबाद: विहीर मंजुरीसाठी आवश्यक ग्रामपंचायतचा ठराव देण्यासाठी शेतकऱ्याकडे ३० हजार रुपये लाच मागणाऱ्या जांभाळा गावाच्या ग्रामसेवकासह मध्यस्थाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कारवाई केली. याविषयी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
ग्रामसेवक बबन आनंदा हलगडे आणि सरपंच पती गणेश उत्तमराव शेलार अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार यांना कृषी विभागाने विहीर मंजूर केली होती. यासाठी त्यांना जांभाळा ग्रामपंचायतचा ठराव आवश्यक होता. या ठरावाची प्रत देण्यासाठी सरपंच पती आणि ग्रामसेवक यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाच मागितली. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलीस उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे, पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी आणि कर्मचारी यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली आणि आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.