शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी वातानुकूलीत वाहनांची मागणी

By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST

अविनाश चमकुरे, नांदेड कधी नव्हे ऐवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत़ त्यामुळे कार्यकर्त्यांना सोन्याचा भाव आला आहे़

अविनाश चमकुरे, नांदेडकधी नव्हे ऐवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत़ त्यामुळे कार्यकर्त्यांना सोन्याचा भाव आला आहे़ त्यात उन्हाचा पारा वाढल्याने प्रचारासाठी कार्यकर्त्यांकडून वातानुकूलीत वाहनांची मागणी होत आहे़ नांदेड जिल्हा क्षेत्रफळाच्या मानाने बराच मोठा आहे़ एकुण नऊ विधानसभा मतदारसंघातून १६४ उमेदवार नशीब आजमावत आहेत़ निवडणूकीस काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराने गती घेतली आहे़ आपला उमेदवार कसा सरस हे सांगताना कार्यकर्ते जीवाचे रान करीत आहेत़ मतदारापर्यंत पोहोचणे सोयीचे व्हावे, प्रवासादरम्यान उन्हाचा त्रास होवू नये यासाठी कार्यकर्ते उमेदवारांकडे वातानुकूलीत व आरामदायी वाहनांची मागणी करीत आहेत़ नांदेड शहरात आयटीआय, रजिस्ट्री आॅफीस, लातूर फाटा परिसरात दोनशेवर भाडोत्री वाहने उभे राहतात़ विधानसभा निवडणूकीसाठी जवळपास सर्व वाहने बूक असल्याने या ठिकाणी एकही वाहन सद्यस्थितीत उभे असल्याचे दिसून येत नाही़ निवडणूक काळात प्रचारासाठी वाहनांची मागणी वाढते याची पुरेपूर कल्पना वाहन मालकांना आहे़ या संधीचा लाभ घेत वाहनमालकांनी भाडे दर दुप्पट-तिप्पटीने वाढविले आहेत़ जादा पैसे देवूनही वाहन उपलब्ध होत नसल्याने काही उमेदवारांनी शक्कल लढवून शेजारील राज्यातून काही वाहने आयात केली आहेत़ तर काहींनी नातेवाईक, मित्रमंडळीकडील वाहने कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी ताब्यात घेतली आहेत़ वाहनांचे भाडे निवडणूक खर्चात मोजले जावू नये यासाठी उमेदवार व कार्यकर्ते पुरेपूर खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे़ निवडणूक नियमांचे उल्लंघन न होवू देता सोयीस्करपणे या वाहनांचा उपयोग कार्यकर्त्यांकडून केला जात आहे़ शिवाय प्रचाररथासाठी छोटा हाथी अ‍ॅपे या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे़ निवडणूक कामासाठी काही वाहने जिल्हा प्रशासनाने भाड्याने घेतली आहेत़ पोलिस दलाकडूनही या वाहनांचा वापर होत असल्याचे दिसून येते़ प्रचार संपेपर्यंत वाहनांची चणचण भासणार आहे़ तोवर गरजुंची गैरसोय होणार आहे़