दिल्लीच्या बुकीचे देशभरात नेटवर्क

By Admin | Updated: May 26, 2015 00:50 IST2015-05-26T00:26:18+5:302015-05-26T00:50:17+5:30

औरंगाबाद : आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आॅनलाईन सट्टा खेळविण्यासाठी नरेश पोतलवाड यास लाईन देणाऱ्या दिल्लीतील दोन मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी अटक करून आणले

Delhi bookie nationwide network | दिल्लीच्या बुकीचे देशभरात नेटवर्क

दिल्लीच्या बुकीचे देशभरात नेटवर्क


औरंगाबाद : आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आॅनलाईन सट्टा खेळविण्यासाठी नरेश पोतलवाड यास लाईन देणाऱ्या दिल्लीतील दोन मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी अटक करून आणले. या आरोपींनी देशभरातील विविध शहरांत अशा प्रकारचा सट्टाबाजार सुरू केल्याचे समोर आले आहे. सोमवारी न्यायालयाने या दोघांना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक झाली आहे.
अमित बाली आणि प्रिन्स ऊर्फ सोमनाथ बहल, अशी दिल्ली येथून अटक करून आणलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास सायबर क्राईम सेलकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पो.नि. गौतम पातारे यांनी दोन्ही आरोपींना दिल्लीतील हकीकतनगर या भागातून ताब्यात घेतले. न्यायालयाकडून त्यांची प्रवास कोठडी घेऊन त्यांना रविवारी रात्री औैरंगाबादेत आणून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांना अटक केली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले की, आरोपी बाली आणि बहल यांनी आरोपी पोतलवाड यास किरायाने लाईन दिली होती. ते पोतलवाड यांच्याकडून त्याकरिता प्रति महा चार हजार रुपये भाडे घेत असत.
स्वत:च्या घरात मिनी टेलिफोन एक्स्चेंज सुरू करणाऱ्या पोतलवाड यास सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रसंगी पोलिसांनी आणखी पुरावे गोळा करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: Delhi bookie nationwide network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.