शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी मनपा वॉर्ड कार्यालयांत खेटे; कुठे आठ, तर कुठे पंधरा दिवसांची वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 17:30 IST

राजकीय ओळख अथवा अर्जासोबत ‘वजन’ ठेवल्यास लवकर काम होते, असे रांगेत उभे असलेल्या अनेक नागरिकांनी नमूद केले.

ठळक मुद्देप्रशासनही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न करीत करताना दिसून येत नाही.महापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमलेले नाहीत.

औरंगाबाद : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मनपाच्या वाॅर्ड कार्यालयांकडून मिळविण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर कुठे आठ दिवस, तर कुठे पंधरा दिवस वेटिंग आहे. झटपट प्रमाणपत्र हवे असल्यास अर्जावर ‘वजन’ ठेवावे लागते. मात्र, या गंभीर प्रकाराकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. प्रशासनही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न करीत करताना दिसून येत नाही.

मनपाच्या ९ झोन कार्यालयांमध्ये जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र देण्याची सुविधा आहे. सर्वाधिक जन्म-मृत्यू प्रमाणपत्र महापालिका मुख्यालयातील झोन क्रमांक १ मध्ये देण्यात येतात. अर्ज दाखल केल्यानंतर किमान दहा ते पंधरा दिवस नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. राजकीय ओळख अथवा अर्जासोबत ‘वजन’ ठेवल्यास लवकर काम होते, असे रांगेत उभे असलेल्या अनेक नागरिकांनी नमूद केले. झोन क्रमांक २ म्हणजेच जुना मोंढा आणि झोन क्रमांक ३ येथील परिस्थिती वेगळी नाही. 

जन्म प्रमाणपत्रात स्पेलिंगची चूकमहापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमलेले नाहीत. अनेक जन्म प्रमाणपत्रात इंग्रजीच्या स्पेलिंगमध्ये चूक करून ठेवण्यात येते. पालकांनी वेळीच चूक निदर्शनास आणून दिल्यास ती दुरुस्त करण्यासाठी आणखी पंधरा दिवस वेळ लागतो. ज्या कर्मचाऱ्यांना इंग्रजीचे अजिबात ज्ञान नाही त्यांना या कामावर बसविण्यात आले आहे. अर्जात अचूक स्पेलिंग लिहिलेले असतानाही मूळ प्रमाणपत्रात चुका असतात.

प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अवघडघाटी रुग्णालयात एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाला असल्यास त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे अजून आले नाही म्हणून किमान दोन महिने नागरिकांना महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. रेकॉर्ड प्राप्त झाल्यानंतरही सहजासहजी प्रमाणपत्र मिळत नाही.  

प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी कार्यालयात आलोयसकाळपासून झोन क्रमांक एकमधील कार्यालयात येऊन बसलो आहे. जुन्या जन्म प्रमाणपत्रात दुरुस्ती करून हवी आहे. आजच अर्ज दाखल केला आहे. जुने रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरू आहे, असे सांगतात. प्रमाणपत्र दुरुस्त करून कधी मिळेल माहीत नाही.- शेख जमीर,नागरिक.

दुरुस्तीच्या जुन्या प्रकरणांमुळे वेळ लागतोअनेक नागरिक पंधरा ते वीस वर्षांनंतर जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. पासपोर्ट काढताना अथवा उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचे असेल, तर जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती करण्यासाठी येतात. जुने रेकॉर्ड काढून बघण्यासाठी वेळ लागतो. वाॅर्ड कार्यालयांमध्ये कामाचा व्याप प्रचंड आहे.- नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका