संगणकीय शिक्षणाचा बोजवारा
By Admin | Updated: August 7, 2014 23:35 IST2014-08-07T01:06:57+5:302014-08-07T23:35:40+5:30
जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०११-१२ मध्ये पाच संगणक संच देण्यात आले होते.

संगणकीय शिक्षणाचा बोजवारा
जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०११-१२ मध्ये पाच संगणक संच देण्यात आले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे हे संगणक दोन वर्षापासून शाळेत धूतखात पडून आहेत.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला संगणक देण्यात आले होते. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळावे, याकरीता जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आले. परंतु या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पालकवर्गातून संताप व्यक्त होत आहे.
जळगाव सपकाळ येथील केंद्रीय शाळेत पहिली ते सातवीपर्यंत ३५० ते ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, या शाळेवर विद्यार्थ्यांना सुविधाच्या नावाने वाणवा भास्त आहे. त्यामध्ये शाळेवर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची सुविधा नाही. घरूनच विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी न्यावे लागत आहे.
संगणक कक्ष आहे. परंतु, लाईट नाही. तसेच संगणकीय शिक्षण देण्याकरीता शिक्षक नाही. एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात ही शाळा अडकली असून, याकडे ना शिक्षण समितीचे लक्ष ना शिक्षण विभागाचे. या सर्व बाबींमुळे शिक्षण विभागाच्याच संगणकीय शिक्षण योजनेचा बोजवारा उडाला आहे. याकरीता शिक्षण विभागाने लक्ष देण्याची व विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने पावले उचलावी, अशी अपेक्षा पालकांची आहे. (वार्ताहर)शाळेत पहिली ते सातवीपर्यंत ३५० ते ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात.या विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळावे, यासाठी सर्वशिक्षा अभियानातर्गत शाळेस पाच संगणक संच देण्यात आले होते. मात्र संगणकीय शिक्षण देण्याकरीता शिक्षक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन वर्षापासून नुकसान होत आहे.