आरोग्य कर्मचाऱ्याची सोशल मीडियावर बदनामी; शिक्षक दाम्पत्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:30+5:302021-05-05T04:07:30+5:30
अमित पोलकम आणि त्यांच्या पत्नीचा आरोपीमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार गोवर्धन जानकू सिनारे (३२, रा. जे. बी. ...

आरोग्य कर्मचाऱ्याची सोशल मीडियावर बदनामी; शिक्षक दाम्पत्यावर गुन्हा
अमित पोलकम आणि त्यांच्या पत्नीचा आरोपीमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार गोवर्धन जानकू सिनारे (३२, रा. जे. बी. व्हॅली, पहाडसिंगपुरा) हे घाटी रुग्णालयात परिचारक म्हणून काम करतात. त्यांच्या शेजारी अमित पोलकम व त्याची पत्नी हे शिक्षक दाम्पत्य राहते. कोरोना साथ आल्यापासून तक्रारदार यांना आणि त्यांच्या पत्नीला आरोपी किरकोळ कारणावरून भांडत असतात. तुम्ही दोघेही कोविड रुग्णांची सेवाकरून येतात. तुमच्यामुळे आम्हाला कोविड होईल. त्यामुळे तुम्ही कोविड संपेपर्यंत दुसरीकडे भाड्याने राहायला जा, असे म्हणत २८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाद घातला. या दाम्पत्याचा मोबाइलवर व्हिडिओ बनवून त्यांनी तो फेसबुक व व्हाॅट्सअॅप ग्रुपवर व्हायरल करून त्यांची बदनामी केली. हा प्रकार लक्षात आल्यावरून सिनारे यांनी बेगमपुरा पोलीस तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक सचिन सानप तपास करत आहेत.