शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीसंख्येत झाली घट; शाळेने ३२ शिक्षक व कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 19:17 IST

संतप्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी स्वामी विवेकानंद अकादमीच्या व्यवस्थापनाला विचारला जाब

ठळक मुद्देया शाळेतील २१ शिक्षक व ११ कर्मचारी मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील  कायम विनाअनुदानित तत्त्वावर आहेत. न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा ३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

औरंगाबाद : विद्यार्थीसंख्येतील घट व परिणामी संचमान्यतेसाठी कार्यभार, पद उपलब्ध नसल्याने चिकलठाणा एमआयडीसीतील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या व्यवस्थापनाने तीन महिन्यांचे मूळ वेतन देत ३२ जणांची सेवा समाप्त केली. त्यामुळे या शाळेत चार तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांना पाचारण करून प्रकरण हाताळण्यात आले. 

या शाळेतील २१ शिक्षक व ११ कर्मचारी मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील  कायम विनाअनुदानित तत्त्वावर आहेत. तीन वर्षांपासून पटसंख्येत घट झाल्याने उपरोक्त पदांना मान्यता नाही.  त्यामुळे त्यांना  कमी केल्याची मुख्याध्यापकांच्या हस्ताक्षरांतील पत्रे शाळा व्यवस्थापनाने सोमवारी कर्मचाऱ्यांच्या घरी स्पीड पोस्टाने पाठवून दिल्याने मंगळवारी शाळेसमोर गोंधळ झाला.

दाद मागणारव्यवस्थापन स्वत:च मराठी माध्यमाला प्रवेश देत नाही. आम्हाला  हेतुपुरस्सर काढण्यात आले आहे. आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही शिक्षण विभाग, तसेच न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा ३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

हा निर्णय व्यवस्थापनाचा अकॅडमीच्या व्यवस्थापकीय मंडळाने हा निर्णय घेतलेला असून, त्यांनी नोटीसमध्ये सेवासमाप्तीचे कारणही दिलेले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. यात  स्थानिक मंडळाचा यात काय हेतू असू शकतो. - सत्यनारायण जैस्वाल, (व्यवस्थापक, स्वामी विवेकानंद अकॅ डमी)  

अद्याप कोणीही तक्रार घेऊन आले नाही विवेकानंद अकॅडमीत घडलेल्या या प्रकरणाबाबत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, अद्याप शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाबाबत आमच्याकडे मंगळवारपर्यंत तरी तक्रार केली नाही. मात्र, अनेक दिवसांपासून शाळेत वाद सुरू आहे. ही संस्था उच्च न्यायालयाच्या आदेशाचेही पालन करीत नाही. १९९४ पासून ही शाळा सुरू आहे. शाळा अनुदानावर आल्यानंतरदेखील या संस्थेने ते नाकारले. प्रशासन म्हणून आम्ही त्या शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. - डॉ. बी.बी. चव्हाण (माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी)

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद