जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्येत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:45+5:302020-12-17T04:29:45+5:30
------------- विमानतळावर आजपासून अॅटोमेटेड पार्किंग व्यवस्था औरंगाबाद : विमानतळावर मंगळवारपासून (दि.१५) अॅटोमेटेड व्हेईकल पार्किंग मनेजमेंट सिस्टमची सुविधा सुरू केली ...

जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्येत घसरण
-------------
विमानतळावर आजपासून
अॅटोमेटेड पार्किंग व्यवस्था
औरंगाबाद : विमानतळावर मंगळवारपासून (दि.१५) अॅटोमेटेड व्हेईकल पार्किंग मनेजमेंट सिस्टमची सुविधा सुरू केली जात आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली. याचे कंत्राट देण्यात आले आहे. विमानतळाच्या आत आणि बाहेर जाण्यासाठी ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
शहरात ढगाळ वातारणात
रिझझिम पावसाची हजेरी
औरंगाबाद : शहरात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी शहरात ढगाळ वातावरण राहिले. अशा वातावरणात शहरात दुपारी २ वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. औरंगपुरा, रोशनगेट, जिन्सी, टाऊन हाल, घाटी परिसरात काही वेळ पावसाची भुरभुर झाली. तर आकाशवाणी, गारखेडा परिसरात पावसाचे काही थेंबच पडले.
-----------
शिबरात २१ दात्यांचे रक्तदान
औरंगाबाद : शिवाई मराठा मंडळातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २१ दात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पुष्पा काळे , ऊर्मिला सावंत, लता वडजे, कविता शिंदे , डॉ. अनुपमा पाथ्रीकर , हेमा काळे ,वैशाली काळे , सीमा जाधव , जयश्री देशमुख, छाया पाटील, आरती पाटील, दिशा पाटील, नीता देशमुख, डॉ. वृषाली देशमुख ,डॉ रंजना देशमुख, डॉ. मोहन देशमुख, रामचंद्र काळे यांनी प्रयत्न केले. औरंगाबाद ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलन करण्यात आले.